एक्स्प्लोर
×
Top
Bottom

Uddhav Thackeray : अरविंद सावंत, अनिल देसाई 'या' दिवशी अर्ज दाखल करणार, उद्धव ठाकरे मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार

Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईतील चार जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्यचे उमेदवार 29 एप्रिलला अर्ज दाखल करणार आहेत.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना 21 जागांवर निवडणूक लढवत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदरसंघांपैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढवत आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम आणि ईशान्य मुंबईत ठाकरेंनी उमेदवार दिले आहेत. यापैकी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे. या ठिकाणी त्यांचे विश्वासू सहकारी दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार अरविंद सावंत रिंगणात आहेत. दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांचे अर्ज 29 एप्रिल रोजी भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे पक्षाकडून देण्यात आली आहे. 

दक्षिण मुंबई लोकसभा आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही उमेदवार 29 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई ओल्ड कस्टम हाऊस येथे 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.  

अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोर्ट येथील पुतळ्याजवळ जमन्याचे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आलं आहे.  

शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ जमन्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यापासून ओल्ड कस्टम हाऊस इथपर्यंत ठाकरे गट शक्तीप्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. 

ठाकरेंचे चार शिलेदार मुंबईतून लढणार 

महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21 जागा मिळाल्या. यामध्ये मुंबईतील चार मतदारसंघांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई, उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर आणि ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांच्या विरोधात राहुल शेवाळे यांचं आव्हान आहे. ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांच्या विरोधात भाजपचे मिहीर कोटेचा यांचं आव्हान आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात उमेदवार महायुतीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. 

संबंधित बातम्या 

 Dindori Lok Sabha : आता माघार नाहीच! माकपच्या जे पी गावितांनी भरला उमेदवारी अर्ज, दिंडोरीत महाविकास आघाडीत बिघाडी

Uddhav Thackeray : वर्षाताईंना खासदार करुन दिल्ली पाठवणार, उद्धव ठाकरेंचा शब्द

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विकेटच्या मागे धोनीचा जलवा, षटकारात युनिवर्स बॉस, गोलंदाजीत शाकीब, पाहा भन्नाट रेकॉर्ड्स
T20 World Cup 2024 : विकेटच्या मागे धोनीचा जलवा, षटकारात युनिवर्स बॉस, गोलंदाजीत शाकीब, पाहा भन्नाट रेकॉर्ड्स
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनाच बाबारच्या संघावर विश्वास नाही, टी20 विश्वचषकाआधी सांगितल्या चुका 
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनाच बाबारच्या संघावर विश्वास नाही, टी20 विश्वचषकाआधी सांगितल्या चुका 
20 संघ, 300 खेळाडू, पण विराट आणि बाबर राहणार किंग, टी20 क्रिकेटचे दोन बादशाह 
20 संघ, 300 खेळाडू, पण विराट आणि बाबर राहणार किंग, टी20 क्रिकेटचे दोन बादशाह 
MMRDA : एमएमआरडीएची मान्सून पूर्व तयारी पूर्ण, मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष
MMRDA : एमएमआरडीएची मान्सून पूर्व तयारी पूर्ण, मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pandharpur Vitthal Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरात गवसला पुरातन ठेवाTop 100 News 10 AM : 100 नंबरी बातम्या : 31 मे 2023 : शुक्रवार : ABP MajhaManoj Jarange Special Report : मनोज जरांगेंचा विधानसभा लढण्याचा इशाराChhagan Bhujbal Special Report : छगन भुजबळ नाराज? का सुरू झाली चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विकेटच्या मागे धोनीचा जलवा, षटकारात युनिवर्स बॉस, गोलंदाजीत शाकीब, पाहा भन्नाट रेकॉर्ड्स
T20 World Cup 2024 : विकेटच्या मागे धोनीचा जलवा, षटकारात युनिवर्स बॉस, गोलंदाजीत शाकीब, पाहा भन्नाट रेकॉर्ड्स
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनाच बाबारच्या संघावर विश्वास नाही, टी20 विश्वचषकाआधी सांगितल्या चुका 
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनाच बाबारच्या संघावर विश्वास नाही, टी20 विश्वचषकाआधी सांगितल्या चुका 
20 संघ, 300 खेळाडू, पण विराट आणि बाबर राहणार किंग, टी20 क्रिकेटचे दोन बादशाह 
20 संघ, 300 खेळाडू, पण विराट आणि बाबर राहणार किंग, टी20 क्रिकेटचे दोन बादशाह 
MMRDA : एमएमआरडीएची मान्सून पूर्व तयारी पूर्ण, मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष
MMRDA : एमएमआरडीएची मान्सून पूर्व तयारी पूर्ण, मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष
Train Cancelled : महामेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द, ब्लॉक कालावधीतील रद्द झालेल्या मेल-एक्सप्रेस गाड्याची यादी पाहा
महामेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द, ब्लॉक कालावधीतील रद्द झालेल्या मेल-एक्सप्रेस गाड्याची यादी पाहा
बाबासाहेबांचा फोटो फाडला, रामदास आठवलेंनी आव्हांडांना सुनावलं; मनुस्मृतीच्या आंदोलनावरही स्पष्टच सांगितलं
बाबासाहेबांचा फोटो फाडला, रामदास आठवलेंनी आव्हांडांना सुनावलं; मनुस्मृतीच्या आंदोलनावरही स्पष्टच सांगितलं
Pandharpur : विठ्ठल मंदिराच्या गुप्त खोलीचे गूढ उलगडले, 3 पुरातन मोठ्या मूर्ती आणि काही इतर लहान मूर्ती 
विठ्ठल मंदिराच्या गुप्त खोलीचे गूढ उलगडले, 3 पुरातन मोठ्या मूर्ती आणि काही इतर लहान मूर्ती 
बीड अन् जालन्याचा निकाल काय असेल, तिथं तुम्ही सांगेल तेच लोकांनी ऐकलंय?; पत्रकाराच्या प्रश्नावर जरागेंचं उत्तर
बीड अन् जालन्याचा निकाल काय असेल, तिथं तुम्ही सांगेल तेच लोकांनी ऐकलंय?; पत्रकाराच्या प्रश्नावर जरागेंचं उत्तर
Embed widget