एक्स्प्लोर

Latur News: नर्सच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षक करतात रुग्णांवर उपचार; लातूरच्या शासकीय महाविद्यालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू

Latur Health News: डॉक्टरांनी तपासणी करुन नर्सला उपचार करण्यासाठी सांगितलं आणि नर्सने तशा सूचना सुरक्षा रक्षकाला दिल्या.

लातूर: जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचं अनेक घटनांमधून दिसून येतंय. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Vilasrao Deshmukh Government College Of Latur) रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं चित्र आहे. या रुग्णालयात चक्क सुरक्षा रक्षक रुग्णांवर उपचार करत असल्याची घटना घडली. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांची सुरक्षारक्षक बरोबर वाद घातला. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

शुक्रवारी रात्री लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वाला या गावचे शब्बीर शेख हे अपघातात जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे आणले असता त्यांना वॉर्ड क्रमांक 27 मध्ये ठेवण्यात आले. या वेळी त्यांना डॉक्टरही तपासून गेले आणि डॉक्टरांनी नर्सला सलाईन आणि इंजेक्शन देण्याचे निर्देश दिले. मात्र नर्सने चक्क सुरक्षा रक्षकाला सलाईन आणि इंजेक्शन देण्यासाठी सांगितलं. 

सुरक्षा रक्षकानेही रुग्णावर उपचार करायला घेतला आणि त्याला रुग्णाच्या नातेवाईकांनी विरोध केला. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी घडलेला प्रकार डॉक्टरांच्या कानावर घातला. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करत नर्स आणि सुरक्षा रक्षकाला फैलावर घेतलं. 

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सोशल माध्यमातही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणेला जाग आली. आता त्यांनी चौकशी समिती नेमून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, सदरील प्रकार गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. याची तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

या महाविद्यालयातील रुग्णालयामध्ये पाण्याची योग्य सोय नसून तिसऱ्या माळ्यावरच्या रुग्णांना पाण्यासाठी पहिल्या माळ्यावर यावं लागतंय. तसेच या ठिकाणचे सुरक्षा रक्षक हे उद्धट असल्याची तक्रार अनेकांनी केल्याची माहिती आहे.या ठिकाणी पेशंटच्या नातेवाईकांना सातत्याने मारहाण होत असते. आता तर सुरक्षारक्षकच नर्सच्या मार्गदर्शनाखाली उपचार करत असल्याचं दिसून येतंय. असे अनेक अनागोदी प्रकार सुरू आहेत. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune  Car Accident: पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला तेव्हा गाडीतून दोघे उतरले होते, दुसरा मुलगा कोणाचा? नाना पटोलेंचा गंभीर सवाल
पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला तेव्हा गाडीतून दोघे उतरले होते, दुसरा मुलगा कोणाचा? नाना पटोलेंचा गंभीर सवाल
June OTT Release : जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेब सीरिजचा वर्षाव; तुम्ही काय पाहणार?
जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेब सीरिजचा वर्षाव; तुम्ही काय पाहणार?
मालेगाव : अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, घटनास्थळी दोन्ही बाजूंनी फायरिंग, आतापर्यंत दोघांना बेड्या
मालेगाव : अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, घटनास्थळी दोन्ही बाजूंनी फायरिंग, आतापर्यंत दोघांना बेड्या
Pune Porsche Accident: विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड; पोर्शेच्या टीमकडून कारची पाहणी पूर्ण, काय लागलं हाती?
विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड, काय लागलं हाती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Supriya Sule on Sassoon hospital : ससूनच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा, सुळेंची मागणीPune Porche Car Accident : पोर्शे गाडीच्या तपासणीतून अपघाताचे धागेदारे हाती लागणार ABP MajhaPM Modi Exclusive Interview : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महामुलाखतNilesh Rane on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना आवरलं पाहिजे, निलेश राणेंनी डिवचलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune  Car Accident: पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला तेव्हा गाडीतून दोघे उतरले होते, दुसरा मुलगा कोणाचा? नाना पटोलेंचा गंभीर सवाल
पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला तेव्हा गाडीतून दोघे उतरले होते, दुसरा मुलगा कोणाचा? नाना पटोलेंचा गंभीर सवाल
June OTT Release : जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेब सीरिजचा वर्षाव; तुम्ही काय पाहणार?
जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेब सीरिजचा वर्षाव; तुम्ही काय पाहणार?
मालेगाव : अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, घटनास्थळी दोन्ही बाजूंनी फायरिंग, आतापर्यंत दोघांना बेड्या
मालेगाव : अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, घटनास्थळी दोन्ही बाजूंनी फायरिंग, आतापर्यंत दोघांना बेड्या
Pune Porsche Accident: विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड; पोर्शेच्या टीमकडून कारची पाहणी पूर्ण, काय लागलं हाती?
विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड, काय लागलं हाती?
गुरमीत राम रहिमला मोठा दिलासा; हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द
गुरमीत राम रहिमला मोठा दिलासा; हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द
Superstar Actor: आजवर एकाही सिनेमानं पार केला नाही 100 कोटींचा टप्पा; पण भाईजान, किंग खानही पडतात फिके, 'हा' सिनेइंडस्ट्रीचा 'सुपरस्टार'
आजवर एकाही सिनेमानं पार केला नाही 100 कोटींचा टप्पा; पण भाईजान, किंग खानही पडतात फिके, 'हा' सिनेइंडस्ट्रीचा 'सुपरस्टार'
दबावाला बळी पडू नका, हा विषय समाजाचा; काँग्रेस आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या डीनच्या भेटीला
दबावाला बळी पडू नका, हा विषय समाजाचा; काँग्रेस आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या डीनच्या भेटीला
मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा
मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा
Embed widget