एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : 'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला

Nashik Lok Sabha Constituency : 20 मे हा नाशिक लोकसभेच्या मतदानाचा दिवस आहे. तोपर्यंत तरी येथे उमेदवार जाहीर करावा, असा टोला छगन भुजबळ यांनी महायुतीला लगावला.

Nashik Lok Sabha Constituency : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महायुतीत (Mahayuti) मात्र नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुतीलाच खोचक टोला लगावला आहे. 

नाशिकच्या जागेवर महायुतीच्या तीनही पक्षांनी दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावला आहे. नाशिकमधून लोकसभा लढवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ देखील इच्छुक होते. मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माघार घेतली. मात्र त्यानंतर देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाने नाशिक जागेवर दावा सोडलेला नाही. तसेच भाजपची नाशिकमध्ये जास्त ताकद आहे, असे सांगत भाजपने देखील या जागेवर दावा ठोकलेला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 

20 मे पर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करावा - छगन भुजबळ

आता यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीला खोचक टोला लगावला आहे. मला वाटलं माझ्यामुळे अडचण होत आहे. त्यामुळे मी निवडणुकीतून दूर झालो. आता अर्ज भरायला देखील सुरुवात झाली आहे. 20 मे हा नाशिक लोकसभेच्या मतदानाचा दिवस आहे. तोपर्यंत तरी येथे उमेदवार जाहीर करावा, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच महायुतीत आम्ही एकत्र काम करणार आहोत. नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा आम्ही निवडून आणू, असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

प्रकाश शेंडगेंना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे - छगन भुजबळ 

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांच्या गाडीला अज्ञाताकडून चपलांचा हार घालत गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की,  प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल तर अतिशय अयोग्य आहे. प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे नेते आहे. मला सगळ्यांना सांगायचं आहे की, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे त्या संविधानाने मताचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला. काही अतिउत्साही कार्यकर्ते असतात ते असं काहीतरी करतात. दादागिरी करून कोणाला थांबवू शकत नाही. प्रकाश शेंडगे यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal: मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांनी नाव घेतल्यानंतर हिरामण खोसकर भुजबळांच्या भेटीला, महायुतीत प्रवेश करणार का? विचारताच आमदार म्हणाले...
अजितदादांनी नाव घेतल्यानंतर हिरामण खोसकर भुजबळांच्या भेटीला, महायुतीत प्रवेश करणार का? विचारताच आमदार म्हणाले...
"मला फाशी द्या, फाशी द्या! मनुस्मृतीच्या विरोधात मी उभा राहणार", जितेंद्र आव्हाड गरजले!
पुण्यातील IT हबमधून 37 कंपन्या स्थलांतरीत, धंगेकरांच्या आरोपात किती तथ्य?; जाणून घ्या सत्य
पुण्यातील IT हबमधून 37 कंपन्या स्थलांतरीत, धंगेकरांच्या आरोपात किती तथ्य?; जाणून घ्या सत्य
संविधानाचं रक्षण करण्याची आणि निरंकुश राजवट संपवण्याची शेवटची संधी; मनमोहन सिंहांचं जनतेला आवाहन
संविधानाचं रक्षण करण्याची आणि निरंकुश राजवट संपवण्याची शेवटची संधी; मनमोहन सिंहांचं जनतेला आवाहन
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde Call Shahajibapu : साताऱ्यातील दरेगावातून मुख्यमंत्री शिंदेंचा शहाजीबापूंना फोनTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM : 30 May 2024 : ABP MajhaEknath Shinde : मुंबईकडचं थोडं टेंशन आहे...गावी आल्यावर जरा निवांत होतो, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्यABP Majha Headlines : 01 PM 30 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांनी नाव घेतल्यानंतर हिरामण खोसकर भुजबळांच्या भेटीला, महायुतीत प्रवेश करणार का? विचारताच आमदार म्हणाले...
अजितदादांनी नाव घेतल्यानंतर हिरामण खोसकर भुजबळांच्या भेटीला, महायुतीत प्रवेश करणार का? विचारताच आमदार म्हणाले...
"मला फाशी द्या, फाशी द्या! मनुस्मृतीच्या विरोधात मी उभा राहणार", जितेंद्र आव्हाड गरजले!
पुण्यातील IT हबमधून 37 कंपन्या स्थलांतरीत, धंगेकरांच्या आरोपात किती तथ्य?; जाणून घ्या सत्य
पुण्यातील IT हबमधून 37 कंपन्या स्थलांतरीत, धंगेकरांच्या आरोपात किती तथ्य?; जाणून घ्या सत्य
संविधानाचं रक्षण करण्याची आणि निरंकुश राजवट संपवण्याची शेवटची संधी; मनमोहन सिंहांचं जनतेला आवाहन
संविधानाचं रक्षण करण्याची आणि निरंकुश राजवट संपवण्याची शेवटची संधी; मनमोहन सिंहांचं जनतेला आवाहन
Video: शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले; जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलवरुनही सुनावले
Video: शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले; जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलवरुनही सुनावले
Panchayat 3 Durgesh Kumar Aka Banrakas : पोटाची खळगी भरण्यासाठी अडल्ट चित्रपटही स्विकारले, पण डिप्रेशन आलं, त्यातच पंचायतचं शूट केलं, 'बनराकस'ची यशोगाथा!
पोटाची खळगी भरण्यासाठी अडल्ट चित्रपटही स्विकारले, पण डिप्रेशन आलं, त्यातच पंचायतचं शूट केलं, 'बनराकस'ची यशोगाथा!
Anant Ambani Radhika Merchant : मुहूर्त ठरला! अनंत अंबानी-राधिका मर्चेंट 12 जुलैला अडकणार लग्नबंधनात; वेडिंग कार्ड पाहिलंत का?
मुहूर्त ठरला! अनंत अंबानी-राधिका मर्चेंट 12 जुलैला अडकणार लग्नबंधनात; वेडिंग कार्ड पाहिलंत का?
नाशकात पाणी टंचाईच्या तीव्र झळा, मनमाडला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा, पेठला दोन हंड्यांसाठी दीड किमीची पायपीट
नाशकात पाणी टंचाईच्या तीव्र झळा, मनमाडला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा, पेठला दोन हंड्यांसाठी दीड किमीची पायपीट
Embed widget