एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेचा तिढा कधी सुटणार? सुनील तटकरेंनी थेट मुहूर्तच सांगितला!

Sunil Tatkare : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नाशिकच्या जागेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. 

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये जोरदार प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे. मात्र महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अजूनही नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी नाशिकच्या जागेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. 

एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी अनेकदा ठाणेवारी करत जोर लावला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट दिल्लीतून माझे नाव चर्चेत आले असे म्हणत नाशिकच्या जागेवर दावा ठोकला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून (BJP) नाशिकमध्ये आमची अधिक ताकद असल्याचा दावा करत ही जागा आम्हालाच मिळावी, अशी मागणी केली आहे.   

नाशिकचा तिढा कधी सुटणार? सुनील तटकरे म्हणाले...

नाशिकच्या जागेबाबत सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की, नाशिक लोकसभेचा (Nashik Lok Sabha Constituency)  क्लेम आम्ही अद्याप सोडलेला नाही. आज संध्याकाळी किंवा उद्या नाशिक लोकसभेचा अंतिम निर्णय होईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता आज किंवा उद्या नाशिकच्या जागेसाठी उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. मात्र नाशिकची जागा राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shiv Sena) की भाजपला (BJP) सुटणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

महायुतीकडून कुणाला संधी? 

दरम्यान, नाशिकमध्ये छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्या नावाला वाढता विरोध पाहता महायुतीकडून पर्यायी उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. यात भाजपचे आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) आणि शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांचे नाव आघाडीवर आहे. त्यातच अजय बोरस्ते यांनी नुकतीच ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता नाशिकमधून छगन भुजबळ की हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार? की महायुती पर्यायी उमेदवाराला संधी देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा

Bharat Gogawale : सुनील तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची, त्यांना विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावीच लागेल, नाहीतर..., भरत गोगावलेंचा थेट इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Meditation in Kanniyakumari : 'आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या', मोदींच्या ध्यानधारणेवर निवडणूक आयोगाचा PMOला सूचना
'आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या', मोदींच्या ध्यानधारणेवर निवडणूक आयोगाचा PMOला सल्ला
परभणीत स्विफ्ट अन् ट्रॅव्हरलचा अपघात, बुलेटही धडकली; विचित्र अपघातात 14 जखमी, 2 गंभीर
परभणीत स्विफ्ट अन् ट्रॅव्हरलचा अपघात, बुलेटही धडकली; विचित्र अपघातात 14 जखमी, 2 गंभीर
सुनील तटकरेच भाजपात जाण्याच्या तयारीत; आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यानं सांगितलं राजकारण
सुनील तटकरेच भाजपात जाण्याच्या तयारीत; आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यानं सांगितलं राजकारण
India GDP Growth : लोकसभा निकालाआधी इकॉनॉमीसाठी खूशखबर, चौथ्या तिमाहीचा GDP 7.8%
India GDP Growth : लोकसभा निकालाआधी इकॉनॉमीसाठी खूशखबर, चौथ्या तिमाहीचा GDP 7.8%
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 28 May 2024Pubs Bar Restaurant New Rules : पब आणि बारसाठी नवी नियमावली, उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णयABP Majha Headlines : 07 PM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 06 PM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Meditation in Kanniyakumari : 'आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या', मोदींच्या ध्यानधारणेवर निवडणूक आयोगाचा PMOला सूचना
'आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या', मोदींच्या ध्यानधारणेवर निवडणूक आयोगाचा PMOला सल्ला
परभणीत स्विफ्ट अन् ट्रॅव्हरलचा अपघात, बुलेटही धडकली; विचित्र अपघातात 14 जखमी, 2 गंभीर
परभणीत स्विफ्ट अन् ट्रॅव्हरलचा अपघात, बुलेटही धडकली; विचित्र अपघातात 14 जखमी, 2 गंभीर
सुनील तटकरेच भाजपात जाण्याच्या तयारीत; आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यानं सांगितलं राजकारण
सुनील तटकरेच भाजपात जाण्याच्या तयारीत; आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यानं सांगितलं राजकारण
India GDP Growth : लोकसभा निकालाआधी इकॉनॉमीसाठी खूशखबर, चौथ्या तिमाहीचा GDP 7.8%
India GDP Growth : लोकसभा निकालाआधी इकॉनॉमीसाठी खूशखबर, चौथ्या तिमाहीचा GDP 7.8%
..तर विधानसभेला 100 टक्के 288 उमेदवार उभे करणार, जरांगेंची घोषणा; पडळकर म्हणाले, ओबीसीतून आरक्षण नाही मिळणार
..तर विधानसभेला 100 टक्के 288 उमेदवार उभे करणार, जरांगेंची घोषणा; पडळकर म्हणाले, ओबीसीतून आरक्षण नाही मिळणार
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी निर्णायक यूपी, महाराष्ट्र, तेलंगणा अन् दक्षिणेचा निकालच सांगून टाकला!
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी निर्णायक यूपी, महाराष्ट्र, तेलंगणा अन् दक्षिणेचा निकालच सांगून टाकला!
Pandharpur Vitthal Mandir Murti : विठ्ठल मंदिरातील गुप्त खोलीत सापडल्या विठ्ठल, व्यंकटेशाच्या मूर्ती
विठ्ठल मंदिरातील गुप्त खोलीत सापडल्या विठ्ठल, व्यंकटेशाच्या मूर्ती
Chhagan Bhujbal : ठाकरेंच्या मदतीला, आव्हाडांची पाठराखण, 400 पारवरुन टीका ते विधानसभांच्या जागांवरुन सुनावले; भुजबळांचं नेमकं चाललं आहे तरी काय?
ठाकरेंच्या मदतीला, आव्हाडांची पाठराखण, 400 पारवरुन टीका ते विधानसभांच्या जागांवरुन सुनावले; भुजबळांचं नेमकं चाललं आहे तरी काय?
Embed widget