एक्स्प्लोर

Jalgaon News : तेलाचा टँकर उलटला अन् उडाली एकच झुंबड, लोकांनी डबे अन् पातेले भरभरून तेल पळवलं! 

Jalgaon News : तेलाचा टँकर उलटल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण भुसावळ शहरात पसरली, अन् नागरिकांची झुंबड उडाली.

Jalgaon News : रस्त्यावर रोजच अपघाताच्या (Accident) घटना घडतात, अनेकदा रस्त्यावरुन जाणारे नागरिक वाहन थांबवून पाहतात. मात्र अनेक जण मदतीला धावून जात नाहीत. दुसऱ्या बाजूला एखादा खाद्यपदार्थांचा किंवा इतर दैनंदिन वस्तूंचा टँकर उलटलेला दिसला, तर लोकांची झुंबड उडालेली दिसते. असाच काहीसा प्रकार भुसावळ (Bhusawal) शहरातील खुशबू हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळाला आहे. 

जळगावच्या (Jalgaon) भुसावळ शहरात (Bhusawal City) महामार्गावरील खुशबू हॉटेलसमोर हा प्रकार घडला आहे. येथील एका चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या नादात कच्चे खाद्यतेल (Oil Tanker) घेऊन जाणारा टँकर उलटल्याची घटना शुक्रवारी (16 जून) दुपारी घडली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र तेलाचा टँकर उलटल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. त्यानंतर अनेकांनी तेल घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  

कोण डबे घेऊन आले, तर कोण पातेलं घेऊन आले

दरम्यान सोयाबीनचे तेल घेऊन जाणारा टँकर गुजरातमधील (Gujarat) अंजिराकडे जात होता. यादरम्यान भुसावळ शहरातील खुशबू हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्गावर एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर उलटला. टँकर उलटल्याने रस्त्यावर तेलाचा सडा पडला. रस्त्यावर तेल सांडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. शहरातील फेकरी आणि इतर आजूबाजूच्या नागरिकांनी तेल भरण्यासाठी एकच गर्दी केली. कोण डबे घेऊन आले, तर कोण पातेलं घेऊन आले, जे हाती मिळेल ते साहित्य घेऊन लोकांनी तेल पळवण्यासाठी गर्दी केली. शिवाय हे तेल रिफायनरीमध्ये जात असल्याने अशुद्ध आणि कच्चे तेल आहे, हे माहित असतानाही नागरिकांनी भरुन नेले. मात्र जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा देखील नागरिक तेलच भरत होते, पोलिसांनी दम भरताच सगळ्यांनी पळ काढला. 

नागरिकांच्या गर्दीने वाहतूक ठप्प 

तसेच यावेळी फुकटचे तेल मिळवण्यासाठी जणू स्पर्धा लागली होती. प्रत्येकजण आपापली भांडी भरण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यातच काहींनी तर अक्षरशः वाहून जाणारे मातीमिश्रित तेलही भरुन नेले. विशेष म्हणजे अगदी लहानग्यापासून वयोवृद्धांपर्यंत अन् पुरुषांपासून महिलांपर्यंत सर्वांनीच जास्तीचे तेल आपल्या भांड्यात कसे पडेल, यासाठी कसरत करत होते. मात्र नागरिकांनी तेल वाहून नेण्यासाठी गर्दी केल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी एकच झुंबड केल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तर याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलच्या (Mobile) कॅमऱ्यात कैद केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डबे घसरले, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डबे घसरले, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी : लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, गडचिरोली नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश
लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, गडचिरोली नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश
Aditi Dravid : पॅकअप झाल्यानंतरची 'ती' रात्र ते मुंबईत स्वत:च्या हक्काचं घरं, अदिती द्रविडने शेअर केला स्वप्नांचा प्रवास 
पॅकअप झाल्यानंतरची 'ती' रात्र ते मुंबईत स्वत:च्या हक्काचं घरं, अदिती द्रविडने शेअर केला स्वप्नांचा प्रवास 
TMKOC Gurucharan Singh : 'तारक मेहता... 'तील सोढीने बेपत्ता झाल्या प्रकरणी अखेर मौन सोडले, अजूनही माझ्या वडिलांना....
'तारक मेहता... 'तील सोढीने बेपत्ता झाल्या प्रकरणी अखेर मौन सोडले, अजूनही माझ्या वडिलांना....
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Beed SSC Pass in 11th Attempt : 10 वेळा नापास, 11व्या प्रयत्नात पास! बीडच्या कृष्णाची गावात मिरवणूकSonia Doohan : नेत्या म्हणून सुप्रिया सुळे अपयशी,  सोनिया दुहान जोरदार कडाडल्या ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM : 28 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 28 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डबे घसरले, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डबे घसरले, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी : लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, गडचिरोली नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश
लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, गडचिरोली नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश
Aditi Dravid : पॅकअप झाल्यानंतरची 'ती' रात्र ते मुंबईत स्वत:च्या हक्काचं घरं, अदिती द्रविडने शेअर केला स्वप्नांचा प्रवास 
पॅकअप झाल्यानंतरची 'ती' रात्र ते मुंबईत स्वत:च्या हक्काचं घरं, अदिती द्रविडने शेअर केला स्वप्नांचा प्रवास 
TMKOC Gurucharan Singh : 'तारक मेहता... 'तील सोढीने बेपत्ता झाल्या प्रकरणी अखेर मौन सोडले, अजूनही माझ्या वडिलांना....
'तारक मेहता... 'तील सोढीने बेपत्ता झाल्या प्रकरणी अखेर मौन सोडले, अजूनही माझ्या वडिलांना....
पुणे, सोलापूरकरांचा घसा कोरडा; उजनी धरणाने गाठली इतिहासातील सर्वात निच्चांकी पातळी
पुणे, सोलापूरकरांचा घसा कोरडा; उजनी धरणाने गाठली इतिहासातील सर्वात निच्चांकी पातळी
Divya Agarwal : घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवालने अखेर सोडलं मौन, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीचा शेवट गोडच...' 
घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवालने अखेर सोडलं मौन, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीचा शेवट गोडच...' 
वर्षाला डाळिंबातून एक कोटींचं उत्पन्न, दहावीत मिळवले 48 टक्के, गावाने फ्लेक्स लावून केले अभिनंदन!
वर्षाला डाळिंबातून एक कोटींचं उत्पन्न, दहावीत मिळवले 48 टक्के, गावाने फ्लेक्स लावून केले अभिनंदन!
बीड पोलीस ॲक्शन मोडवर, 400 जणांना नोटीस, 16 गुन्हे दाखल; सोशल मीडियावरील पोस्टही हटवल्या
बीड पोलीस ॲक्शन मोडवर, 400 जणांना नोटीस, 16 गुन्हे दाखल; सोशल मीडियावरील पोस्टही हटवल्या
Embed widget