एक्स्प्लोर

धाराशिवमध्ये पद्मसिंह पाटलांची भेट; नाराज नेत्याला अजित पवारांचा शब्द, विधानपरिषद देणार

Dharashiv Loksabha, Ajit Pawar Meeting : धाराशिवमध्ये राजकीय घडोमोडींना वेग आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

Dharashiv Loksabha, Ajit Pawar Meeting : धाराशिवमध्ये राजकीय घडोमोडींना वेग आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी माजी मंत्री पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) यांची भेट घेतली आहे. अजित पवार धाराशिवमधील पाटील यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे. दरम्यान, पवार यांनी धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या सुरेश बिराजदार यांची नाराजी दूर करण्यासाठी आमदारकीचे आश्वासन दिले आहे. लोकसभा निवडणुका लागण्यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदार यांचे नाव चर्चेत होते. दरम्यान, उमेदवारी मिळाली नाही, म्हणून नाराज असलेल्या बिराजदार यांना अजित पवारांकडून आमदारकीचे आश्वासन देण्यात आले आहे. 

अजित पवारांचा बिराजदार यांना शब्द 

धाराशिवमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सुरेश बिराजदार इच्छुक होते. अजित पवारांनी त्यांना धाराशिवमधून तयारी करण्यासही सांगितले होते. मात्र, काही गोष्टी घडल्या पण मी वाऱ्यावर सोडणार नाही, विधानपरिषदेवर संधी देऊ, असा शब्द अजित पवार यांनी सुरेश बिराजदार यांना दिला आहे. त्यामुळे अर्चना पाटील यांना निवडणुकीत नाराज नेत्यांचा फटका बसू शकला असता. मात्र, अजित पवारांनी सुरेश बिराजदारांना शब्द देत एक प्रकारे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे. 

अर्चना पाटलांसमोर ओमराजेंचे आव्हान 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासमोर ठाकरेंचे शिवसैनिक ओमराजे निंबाळकर यांचे कडवे आव्हान असणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात मोठा जनसंपर्क निर्माण केलाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध महायुती कोणाला उमेदवारी देणार ? याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, शेवटी अजित पवारांनी आणि महायुतीने ओमराजे यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी जाहीर केलीये. 

गेल्यावेळी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर आमने-सामने होते. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील यांचा दारुण पराभव केला होता. दरम्यान, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राणा पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर राणा पाटील यांनी तुळजापूरमधून विधानसभा निवडणूक लढवली आणि ते तुळजापूरचे आमदार झाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

27 एकरचं मैदान, 3 हेलिपॅड, मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त, महादेव जानकरांसाठी महायुतीची तगडी फिल्डिंग!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावरच धाड, 3 कोटींचं साहित्य जप्त; लातुरात 7 जणांविरुद्ध गुन्हा
गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावरच धाड, 3 कोटींचं साहित्य जप्त; लातुरात 7 जणांविरुद्ध गुन्हा
Sangli Crime : जतमधील माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणातील फरारी संशयित आरोपी अखेर स्वत:हून हजर
जतमधील माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणातील फरारी संशयित आरोपी अखेर स्वत:हून हजर
T20 World Cup 2024 : विराट कोहली-रोहित शर्माकडे शेवटची संधी! विश्वविजेता होण्यासाठी करावं लागेल हे काम 
T20 World Cup 2024 : विराट कोहली-रोहित शर्माकडे शेवटची संधी! विश्वविजेता होण्यासाठी करावं लागेल हे काम 
Dombivli Blast : आग विझवायला गेले आणि सिलेंडरचा स्फोट झाला, डोंबिवलीतील चायनिजच्या दुकानात भडका, नऊ जखमी
आग विझवायला गेले आणि सिलेंडरचा स्फोट झाला, डोंबिवलीतील चायनिजच्या दुकानात भडका, नऊ जखमी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bandra Nale Safai : मुंबईतील नालेसफाईचा दावा फोल, रेल्वे ट्रॅकदरम्यान नाल्यांमध्ये घाणीचं साम्राज्यCentral Railway Mega Block : मध्य रेल्वेवर 1 आणि 2 जूनला 36 तासांचा महामेगाब्लॉकSambhajinagar Tourism : मराठवाडा तहानेनं व्याकूळ, पर्यटनस्थळांना बसला दुष्काळाचा फटकाVinayak Kale Sassoon Hospital : ससूनमधले केवळ दोन ते तीन स्टाफ या सगळ्यांध्ये गुंतलेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावरच धाड, 3 कोटींचं साहित्य जप्त; लातुरात 7 जणांविरुद्ध गुन्हा
गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावरच धाड, 3 कोटींचं साहित्य जप्त; लातुरात 7 जणांविरुद्ध गुन्हा
Sangli Crime : जतमधील माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणातील फरारी संशयित आरोपी अखेर स्वत:हून हजर
जतमधील माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणातील फरारी संशयित आरोपी अखेर स्वत:हून हजर
T20 World Cup 2024 : विराट कोहली-रोहित शर्माकडे शेवटची संधी! विश्वविजेता होण्यासाठी करावं लागेल हे काम 
T20 World Cup 2024 : विराट कोहली-रोहित शर्माकडे शेवटची संधी! विश्वविजेता होण्यासाठी करावं लागेल हे काम 
Dombivli Blast : आग विझवायला गेले आणि सिलेंडरचा स्फोट झाला, डोंबिवलीतील चायनिजच्या दुकानात भडका, नऊ जखमी
आग विझवायला गेले आणि सिलेंडरचा स्फोट झाला, डोंबिवलीतील चायनिजच्या दुकानात भडका, नऊ जखमी
Sassoon Hospital : लाच खाऊन रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकणाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती होताच 'ससून'चे डीन विनायक काळेंनी पळ काढला
लाच खाऊन रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकणाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती होताच 'ससून'चे डीन विनायक काळेंनी पळ काढला
अखेर 25 तासांनी लोकल सुरू; रेल्वेच्या 250 कर्मचाऱ्यांनी अविरत केलं काम; पण गुजरातच्या विद्यार्थीनीची परीक्षा बुडाली
अखेर 25 तासांनी लोकल सुरू; रेल्वेच्या 250 कर्मचाऱ्यांनी अविरत केलं काम; पण गुजरातच्या विद्यार्थीनीची परीक्षा बुडाली
Prajwal Revanna : महिला अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाची विदेशातून येण्यापूर्वीच जामिनासाठी धडपड, आईकडून न्यायालयात याचिका दाखल
महिला अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाची विदेशातून येण्यापूर्वीच जामिनासाठी धडपड, आईकडून न्यायालयात याचिका दाखल
शिंदेंचे श्रीरंग बारणे की ठाकरेंचे संजोग वाघेरे, कोण बाजी मारणार? 113 टेबलवर मतमोजणी होणार!
शिंदेंचे श्रीरंग बारणे की ठाकरेंचे संजोग वाघेरे, कोण बाजी मारणार? 113 टेबलवर मतमोजणी होणार!
Embed widget