एक्स्प्लोर

Sangli News : अंगावर काळी साडी आणि हातात सूप! सांगलीत अवतरली भुताची आई 'तडकडताई'

Sangli News : सांगलीमध्ये प्रचंड उत्साहात तडकडताईच्या खेळांना सुरवात

Sangli Local News Updates : तडकडताई भुताची आई म्हणत आजपासून सांगलीत तडकडताईच्या खेळांना सुरुवात झाली. सांगलीकर नागरिकांची आवडती आणि लाडकी असणारी तडकडताईने आजपासून सांगलीत आपल्या खेळांना सुरवात केली. जेष्ठ आषाढ अमावस्येला तडकडताईच्या खेळांना सुरवात होते.  आज सांगलीतील सिद्धार्थ परिसरात दिवा काढण्यात आला आणि तडकडताईच्या खेळालासुरवात झाली. पुढील आठ दिवस ही तडकडताई सांगलीत गल्लीबोळात फिरून अबाल वृद्धाना सुपाने मारत असते. तडकडताईचा मुखवटा हा भूतासारखा दिसतो. त्यामुळे तिला सगळी ताडजडताई भुताची आई म्हणून संबोधतात. आज तडकडताईला पाहण्यासाठी सिद्धार्थ परिसर, गावभागात आबालवृद्धांची मोठी गर्दी पहायला मिळाली.

सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत आणि पळण्याची लगबग पसरलीय भुताची आई असलेली तडकडताई मुळे.. जेष्ठ महिन्यात आषाडीच्या अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी म्हैशासुर मरर्दीनी तड्कड ताईचा वेश घेऊन शहराची रखवाली करण्यासाठी फिरत असते.  अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी हि आहे तडडताई.  जेष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरवात होते. तडकडताई, भुताची आई, असा गजर करत लहान मुले या तडकडीचे स्वागत करतात. कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान असतो. ही परंपरा गेल्या 250 वर्षापासून सांगलीत सुरू आहे.. कर्नाटक मधील बदामी येथून 7 वाट्या मानव लोकांनी पळवून आणल्या होत्या. त्यातली वाटी एक सांगली, आष्टा, कासेगाव, पलूस, कवठेपिरान अश्या ठिकाणी आल्या आहेत. त्यावेळी पासून ही प्रथा सुरू आहे.. दैत्य लोक त्यावेळी मानवाला त्रास करत होते, त्यावेळी चौडेश्वर देवी वाट्याच्या रुपात या गांवा मध्ये आली आणि मानवाच्या संरक्षण करण्यासाठी हा अवतार घेत असते. सांगली शहरात जोगण्या उत्सव हा जेष्ठ अमावास्येला संध्याकाळी 4 वाजता सुरु होतो. काळी साडी हातात सूप आणी चेहर्याला तडकडीचा मुखवटा अशा वेशात तड्कड ताईच्या लग्नाची वरात काढण्यात येते. कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे थेट स्मशानात संध्याकाळी ६ वाजता या तडकडताई च्या लग्नासाठी शेकडो आबालवृद्ध हजार असतात, सूर्य अस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षताने तिचा विवाह पार पडतो. विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या हातातील सुपाने प्रसाद देते. या सुपाचा मार बसला की मुलांवरील इडा पिडा टळते अशी आख्यायिका आहे. अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते. तडकड ताईचा दरारा हा खूप मोठा असतो. अनेक लहान मुलेच नाहीत तर मोठी मुलेही या तड्कडताई ला प्रचंड घाबरतात. संस्थान काळापासून सुरु असलेली हि परंपरा आता 21 व्या शतकातहि जपली जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टी20 विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राईक रेट कुणाचा? एकही भारतीय नाही, पाहा टॉप 5 खेळाडूंची यादी
टी20 विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राईक रेट कुणाचा? एकही भारतीय नाही, पाहा टॉप 5 खेळाडूंची यादी
VIDEO : इतके षटकार का खातोय? चाहतीने कॅमेऱ्यासमोरच पाक खेळाडूच्या अब्रूचे धिंडवडे काढले
VIDEO : इतके षटकार का खातोय? चाहतीने कॅमेऱ्यासमोरच पाक खेळाडूच्या अब्रूचे धिंडवडे काढले
VIDEO : विश्वचषकासाठी विराट कोहली रवाना, मुंबई विमानतळावर किंग झाला स्पॉट
VIDEO : विश्वचषकासाठी विराट कोहली रवाना, मुंबई विमानतळावर किंग झाला स्पॉट
नवी मुंबईतील होर्डिंग्जवर कारवाईकरता हायकोर्टाचा हिरवा कंदील, नव्यानं परवानगीकरता अर्ज करण्याची मुभा
नवी मुंबईतील होर्डिंग्जवर कारवाईकरता हायकोर्टाचा हिरवा कंदील, नव्यानं परवानगीकरता अर्ज करण्याची मुभा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM 30 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBMC Furniture Scam Mumbai : सकारात्मक शेऱ्यासाठी कंत्राटदारालाच मागितली लाचChhaya Kadam Interview : कान्समधील साडी-नथ, फोटोशूटचा किस्सा, आईची शेवटची इच्छा; छाया कदम ExclusivePune Car Accident Case Update : नार्को टेस्टवरुन पेटलं राजकारण, नेते मंडळी भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टी20 विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राईक रेट कुणाचा? एकही भारतीय नाही, पाहा टॉप 5 खेळाडूंची यादी
टी20 विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राईक रेट कुणाचा? एकही भारतीय नाही, पाहा टॉप 5 खेळाडूंची यादी
VIDEO : इतके षटकार का खातोय? चाहतीने कॅमेऱ्यासमोरच पाक खेळाडूच्या अब्रूचे धिंडवडे काढले
VIDEO : इतके षटकार का खातोय? चाहतीने कॅमेऱ्यासमोरच पाक खेळाडूच्या अब्रूचे धिंडवडे काढले
VIDEO : विश्वचषकासाठी विराट कोहली रवाना, मुंबई विमानतळावर किंग झाला स्पॉट
VIDEO : विश्वचषकासाठी विराट कोहली रवाना, मुंबई विमानतळावर किंग झाला स्पॉट
नवी मुंबईतील होर्डिंग्जवर कारवाईकरता हायकोर्टाचा हिरवा कंदील, नव्यानं परवानगीकरता अर्ज करण्याची मुभा
नवी मुंबईतील होर्डिंग्जवर कारवाईकरता हायकोर्टाचा हिरवा कंदील, नव्यानं परवानगीकरता अर्ज करण्याची मुभा
Bhusawal Crime Updates : भुसावळ हत्याकांड प्रकरणात 8 संशयित पोलिसांच्या ताब्यात, अंदाधुंद गोळीबार करत घेतला माजी नगरसेवकाचा जीव
भुसावळ हत्याकांड प्रकरणात 8 संशयित पोलिसांच्या ताब्यात, अंदाधुंद गोळीबार करत घेतला माजी नगरसेवकाचा जीव
Watch : रोहित सेनेकडून विश्वचषकाची फुलप्रूफ तयारी,  वॉर्मअप सामन्याआधी कसून सराव
Watch : रोहित सेनेकडून विश्वचषकाची फुलप्रूफ तयारी,  वॉर्मअप सामन्याआधी कसून सराव
Akola Crime : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला अकोल्यात अटक; एक देशी कट्टा आणि 7 जिवंत काडतूस जप्त
दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला अकोल्यात अटक; एक देशी कट्टा आणि 7 जिवंत काडतूस जप्त
डॉ. तावरेचा सिनेस्टाईल प्लॅन, अल्पवयीन मुलांच्या ब्लडग्रुपशी मिळते-जुळते तीन व्यक्ती केले होते तयार; असं रचलं कट-कारस्थान
डॉ. तावरेचा सिनेस्टाईल प्लॅन, अल्पवयीन मुलांच्या ब्लडग्रुपशी मिळते-जुळते तीन व्यक्ती केले होते तयार; असं रचलं कट-कारस्थान
Embed widget