एक्स्प्लोर

Kolhapur News : काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराज यांना मानलं नाही, राजेश क्षीरसागरांची टीका

Rajesh Kshirsagar : एमआयएमसारख्या जहालवादी पक्षाचा पाठिंबा कोल्हापुरात शाहू महाराजांना महागात पडणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर : काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराज यांना मानलं नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. स्वतःच्या अंगावर आलेली उमेदवारी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शाहू महाराजांच्या गळ्यात मारली असल्याचे राजेश क्षीरसागर म्हणाले. 

तर त्यांना राज्यसभेवर का घेतलं नाही? 

एमआयएमसारख्या जहालवादी पक्षाचा पाठिंबा कोल्हापुरात शाहू महाराजांना महागात पडणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भगव्या ध्वजाचे मानकरी असणाऱ्या शाहू महाराजांना आता बाजूला वेगळा झेंडा लावायचा आहे का? समतेचा संदेश देणारे शाहू महाराज जहालवादी लोकांसोबत जाणार का? अशी विचारणा केली. काँग्रेसने कधीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराज यांना मानलं नसल्याचे म्हणाले. शाहू महाराजांना सन्मानच द्यायचा होता तर त्यांना राज्यसभेवर का घेतलं नाही? अशी विचारणा त्यांनी केली. 

आरोप मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचाही आक्षेप 

राजेश क्षीरसागर यांनी एमआयएमच्या पाठिंब्यावर आक्षेप घेतल्यानंतर मराठा आंदोलक दिलीप पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, कोल्हापुरात एमआयएमची हिरवी लाट आणण्याचा प्रयत्न असून कोल्हापूरचा बेहरमपाडा आणि भिवंडी करायचे आहे म्हणूनच एमआयएमने शाहू महाराज याना पाठिंबा दिला आहे. 

त्यांनी सांगितले की, सीएएबाबत आंदोलनाचे नेतृत्व केल्याने कोल्हापुरात एमआयएमला पोषक वातावरण वाटत आहे. त्यामुळेच हे सगळं सुरू असल्याचा आरोप दिलीप पाटील यांनी केला. एमआयएम रझाकार आणि निजामाचे वंशज आहेत, तर औरंगजेबच्या थडग्यावर फुले उधळणारे वंचित सुद्धा पाठिंबा देत असेल तर हे मोठे षड्यंत्र आहे. आम्हाला निजाम आणि औरंगजेबाचा महाराष्ट्र आम्हाला करायचा नाही. कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीचा बदला घेण्याचाही प्रयत्न यातून दिसून येत असून कोल्हापूरकरांनी सावध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 

एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा 

दरम्यान, शाहू महाराजांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी, नव्याने स्थापन बहुजन पक्षानंतर एमआयएम पक्षानेही शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत शाहू महाजारांना पाठिंबा दिला. कोल्हापुरात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलि आणि शाहू महाराजांमध्ये थेट लढत होत आहे. अन्य अपक्षांनी अर्ज दाखल केले असले, तरी तुल्यबळ लढत शाहू महाराज आणि मंडलिक यांच्यामध्येच होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi : निकालाआधी साईदरबारी बड्या नेत्यांची भेट, राणेंच्या लेकाला पंकजाताईंनी सांगितला किस्सा
निकालाआधी साईदरबारी बड्या नेत्यांची भेट, राणेंच्या लेकाला पंकजाताईंनी सांगितला किस्सा
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie :  अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला?
अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला? "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटात समोर येणार सत्य?
अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार
अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Vote Counting Process In India: EVM ची मतमोजणी कशी होते? आतापर्यंत कोणीच न सांगितलेली माहितीABP Majha Headlines : 02 PM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM : 31 May 2024 : ABP MajhaManoj Jarange Pune : जुना गुन्हा, कोर्टात हजेरी जरांगे पाटील काय म्हणाले? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi : निकालाआधी साईदरबारी बड्या नेत्यांची भेट, राणेंच्या लेकाला पंकजाताईंनी सांगितला किस्सा
निकालाआधी साईदरबारी बड्या नेत्यांची भेट, राणेंच्या लेकाला पंकजाताईंनी सांगितला किस्सा
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie :  अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला?
अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला? "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटात समोर येणार सत्य?
अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार
अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार
Bihar Politics : भाजप आणि जदयूचा स्वतंत्र प्रचार, नितीशकुमारांचा दाखला देत तेजस्वी यादवांचा मोठा दावा, म्हणाले काहीतरी मोठं घडणार...
Bihar Politics : 4 जूननंतर मोठं काही तरी घडणार, तेजस्वी यादव यांचा नितीशकुमारांचा उल्लेख करत पुन्हा दावा
भेगाळल्या भुईगत जीणं... गावची 110 शेततळं आटली, डोळ्यात पाणी; डाळिंबाच्या बागा वाळल्या, बळीराजावर मजुरीची वेळ
भेगाळल्या भुईगत जीणं... गावची 110 शेततळं आटली, डोळ्यात पाणी; डाळिंबाच्या बागा वाळल्या, बळीराजावर मजुरीची वेळ
Jalna News: जागा हडपण्यासाठी दानवेंनी गरीब कुटुंबाचे घर हडपले, वडेट्टीवारांचा आरोप; काय आहे प्रकरण?
जागा हडपण्यासाठी दानवेंनी गरीब कुटुंबाचे घर हडपले, वडेट्टीवारांचा आरोप; काय आहे प्रकरण?
मोठी बातमी! विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली गुप्त खोली, या खोलीत नेमकं काय? पुरातत्व विभाग करणार पाहणी
मोठी बातमी! विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली गुप्त खोली, या खोलीत नेमकं काय? पुरातत्व विभाग करणार पाहणी
Embed widget