एक्स्प्लोर
×
Top
Bottom

Yavatmal Washim Lok Sabha: गवळींचा पत्ता कापून शिंदेंकडून राजश्री पाटलांना उमेदवारी, ठाकरेंचा जुना शिवसैनिक यवतमाळ-वाशिम मतदारसंघ खेचून आणणार?

Loksabha Election 2024: यंदा यवतमाळ-लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. सलग पाच टर्म खासदार राहिल्यानंतर पहिल्यांदाच भावना गवळी या निवडणुकीच्या रिंगणात नाहीत.

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात होऊ घातलेल्या लक्षवेधी लढतींपैकी एक म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. भावना गवळी यांच्यामुळे यवतमाळ वाशिम (Yavatmal–Washim Lok Sabha) हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. भावना गवळी (Bhavana Gawali) या सलग पाच टर्म या मतदारसंघाच्या खासदार राहिल्या आहेत. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ पुन्हा शिंदे गटाच्या वाट्याला आला. मात्र, भावना गवळी यांच्याविरोधातील अँटी-इन्कम्बन्सी आणि भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे भाजपचा त्यांना उमेदवारी देण्यास विरोध होता. त्यामुळे भावना गवळी यांनी संपूर्ण जोर पणाला लावूनही त्यांना यवतमाळ-वाशिममधून लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही. त्यांच्याऐवजी शिंदे गटाने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय देशमुख हे रिंगणात आहेत. त्यामुळे यवतमाळ-वाशिमची मुख्य लढत राजश्री पाटील आणि संजय देशमुख यांच्यातच होणार आहे. यामध्ये आता कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची पार्श्वभूमी

यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ 2008 साली अस्तित्त्वात आला. यापूर्वी हा मतदारसंघ खामगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. 1977 मध्ये या मतदारसंघाचे वाशिम लोकसभा मतदारसंघ असे नामकरण झाले. त्यानंतर 2008 साली झालेल्या पुनर्रचनेत आताचा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ आकाराला आला. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. सुरुवातीच्या काळात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1977 मध्ये वसंतराव नाईक हे वाशिमचे खासदार बनले. त्यापूर्वी अर्जुन कस्तुरे दोन टर्म खासदार होते. काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद हेदेखील दोनवेळा या मतदारसंघातून निवडून लोकसभेवर गेले होते. 

यवतमाळ-वाशिमधील काँग्रेसच्या वर्चस्वाला सर्वप्रथम आव्हान दिले ते शिवसेनेचे नेते आणि भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळी यांनी. त्यांनी 1996 साली हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून खेचून आणला. मात्र, 1998 मध्ये सुधाकरराव नाईक यांनी पुन्हा या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून दिला. त्यानंतर 1999 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने भावना गवळी यांना रिंगणात उतरवले. तेव्हापासून भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघावर अक्षरश: एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. त्या सलग पाच टर्म या मतदारसंघाच्या खासदार राहिल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजश्री पाटील आणि संजय देशमुख यांच्यापैकी कोणीही जिंकले तरी हा मतदारसंघ एकप्रकारे शिवसेनेच्याच ताब्यात राहणार आहे.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात कोणत्या पक्षाची किती ताकद?

लोकसभा निवडणुकीत एखादा उमेदवार निवडून येण्यासाठी आजुबाजूच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्या पक्षाचे आमदार आहेत, यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील दोन आणि यवतमाळमधील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी चार मतदारसंघांमध्ये भाजप, एका ठिकाणी शिंदे गट आणि एका मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. विद्यमान खासदार भावना गवळी आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड हे शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला या मतदारसंघात महायुतीचे पारडे वरचढ दिसत आहे.


यवतमाळ-वाशिममध्ये कोणते फॅक्टर निर्णायक ठरणार?

यंदा यवतमाळ-लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. सलग पाच टर्म खासदार राहिल्यानंतर पहिल्यांदाच भावना गवळी या निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. त्यांच्याविरोधात अँटी-इन्कन्बन्सीचा फॅक्टर ग्राह्य धरला तरी अजूनही या मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या तुलनेत राजश्री पाटील या नवख्या आहेत. यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी नाकारल्यानंतर भावना गवळी प्रचंड नाराज झाल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढायचीच, असा चंगही त्यांना बांधला होता. राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरतानाही भावना गवळी या त्यांच्या घरीच थांबून राहिल्या होत्या. आता त्यांची नाराजी दूर होऊन त्या राजश्री पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाल्या असल्या तरी त्या किती तडफेने काम करतील, याबाबत शंका आहे. महायुती आणि स्वत: एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण ताकद लावून जयश्री पाटील यांचा प्रचार केला तरी भावना गवळी या निवडणुकीत कितपत सक्रिय राहणार, यावर यवतमाळ-वाशिमचा निकाल ठरु शकतो.

कोण आहेत राजश्री पाटील?

राजश्री पाटील या शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. यवतमाळ हे राजश्री पाटलांचं माहेर तर सासर नेर आहे. सध्या त्या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष आहेत. याशिवाय, गेल्या काही वर्षांमध्ये राजश्री पाटील यांनी महिला अर्थ साक्षरता, महिला सबलीकरण, बचत गट, शिक्षण संस्था आणि सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहे. या माध्यमातून राजश्री पाटील यांनी महिला मतदारांशी चांगल्याप्रकारे जनसंपर्क प्रस्थापित केला आहे. राजश्री पाटील यांनी 2012 साली पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. 2019 ला नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांना 37 हजार मतं मिळाली होती. यंदा त्या थेट लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. 

कोण आहेत संजय देशमुख?

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हे यंदा राजश्री पाटील यांना हरवून हा मतदरासंघ ठाकरे गटाकडे खेचून आणणार का,याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. संजय देशमुख यांच्या राजकीय कारकीर्दीकडे नजर टाकल्यास त्यांनी अनेक वर्षे अपक्ष उमेदवार म्हणून राजकारण केले. बराच काळ ते अपक्ष आमदार राहिले. त्यांनी जवळपास 10 वर्षे दिग्रस आणि आणि विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले आहे. संजय देशमुख यांनी नंतरच्या काळात शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी दीर्घकाळ तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 1999 मध्ये त्यांनी बंडखोरी करुन शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.त्यांनी अपक्ष आमदार असूनही राज्यमंत्रीपद भुषविण्याची किमया करुन दाखवली आहे, ते 2002 ते 2004 या काळात ते क्रीडा व खनिकर्म खात्याचे राज्यमंत्री होते. 2008 पासून संजय देशमुख  यवतमाळ जिल्हा बँकेचे संचालक आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राठोड यांनी दिग्रस मतदारसंघात संजय देशमुख यांचा पराभव केला होता.

आणखी वाचा

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' पॅटर्न; उमेदवाराने अर्जासोबत दिली चक्क साडेबारा हजारांची चिल्लर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विकेटच्या मागे धोनीचा जलवा, षटकारात युनिवर्स बॉस, गोलंदाजीत शाकीब, पाहा भन्नाट रेकॉर्ड्स
T20 World Cup 2024 : विकेटच्या मागे धोनीचा जलवा, षटकारात युनिवर्स बॉस, गोलंदाजीत शाकीब, पाहा भन्नाट रेकॉर्ड्स
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनाच बाबारच्या संघावर विश्वास नाही, टी20 विश्वचषकाआधी सांगितल्या चुका 
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनाच बाबारच्या संघावर विश्वास नाही, टी20 विश्वचषकाआधी सांगितल्या चुका 
20 संघ, 300 खेळाडू, पण विराट आणि बाबर राहणार किंग, टी20 क्रिकेटचे दोन बादशाह 
20 संघ, 300 खेळाडू, पण विराट आणि बाबर राहणार किंग, टी20 क्रिकेटचे दोन बादशाह 
MMRDA : एमएमआरडीएची मान्सून पूर्व तयारी पूर्ण, मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष
MMRDA : एमएमआरडीएची मान्सून पूर्व तयारी पूर्ण, मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pandharpur Vitthal Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरात गवसला पुरातन ठेवाTop 100 News 10 AM : 100 नंबरी बातम्या : 31 मे 2023 : शुक्रवार : ABP MajhaManoj Jarange Special Report : मनोज जरांगेंचा विधानसभा लढण्याचा इशाराChhagan Bhujbal Special Report : छगन भुजबळ नाराज? का सुरू झाली चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विकेटच्या मागे धोनीचा जलवा, षटकारात युनिवर्स बॉस, गोलंदाजीत शाकीब, पाहा भन्नाट रेकॉर्ड्स
T20 World Cup 2024 : विकेटच्या मागे धोनीचा जलवा, षटकारात युनिवर्स बॉस, गोलंदाजीत शाकीब, पाहा भन्नाट रेकॉर्ड्स
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनाच बाबारच्या संघावर विश्वास नाही, टी20 विश्वचषकाआधी सांगितल्या चुका 
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनाच बाबारच्या संघावर विश्वास नाही, टी20 विश्वचषकाआधी सांगितल्या चुका 
20 संघ, 300 खेळाडू, पण विराट आणि बाबर राहणार किंग, टी20 क्रिकेटचे दोन बादशाह 
20 संघ, 300 खेळाडू, पण विराट आणि बाबर राहणार किंग, टी20 क्रिकेटचे दोन बादशाह 
MMRDA : एमएमआरडीएची मान्सून पूर्व तयारी पूर्ण, मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष
MMRDA : एमएमआरडीएची मान्सून पूर्व तयारी पूर्ण, मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष
Train Cancelled : महामेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द, ब्लॉक कालावधीतील रद्द झालेल्या मेल-एक्सप्रेस गाड्याची यादी पाहा
महामेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द, ब्लॉक कालावधीतील रद्द झालेल्या मेल-एक्सप्रेस गाड्याची यादी पाहा
बाबासाहेबांचा फोटो फाडला, रामदास आठवलेंनी आव्हांडांना सुनावलं; मनुस्मृतीच्या आंदोलनावरही स्पष्टच सांगितलं
बाबासाहेबांचा फोटो फाडला, रामदास आठवलेंनी आव्हांडांना सुनावलं; मनुस्मृतीच्या आंदोलनावरही स्पष्टच सांगितलं
Pandharpur : विठ्ठल मंदिराच्या गुप्त खोलीचे गूढ उलगडले, 3 पुरातन मोठ्या मूर्ती आणि काही इतर लहान मूर्ती 
विठ्ठल मंदिराच्या गुप्त खोलीचे गूढ उलगडले, 3 पुरातन मोठ्या मूर्ती आणि काही इतर लहान मूर्ती 
बीड अन् जालन्याचा निकाल काय असेल, तिथं तुम्ही सांगेल तेच लोकांनी ऐकलंय?; पत्रकाराच्या प्रश्नावर जरागेंचं उत्तर
बीड अन् जालन्याचा निकाल काय असेल, तिथं तुम्ही सांगेल तेच लोकांनी ऐकलंय?; पत्रकाराच्या प्रश्नावर जरागेंचं उत्तर
Embed widget