एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha : शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आजपासून सुरुवात झाली. शांतीगिरी महाराजांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

शांतीगिरी महाराज हे महायुतीतून (Mahayuti) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्यासाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटदेखील घेतली होती. महायुतीतून शांतीगिरी महाराज निवडणूक लढवणार, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती. मात्र शांतीगिरी महाराजांचे नाव मागे पडले. 

शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

यानंतर शांतीगिरी महाराजांनी नाशिकमधून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधी त्यांनी आठ दिवसांचे अनुष्ठान देखील केले होते. अनुष्ठानाच्या सांगतेवेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर नाशिक शहरात बाबाजी परिवाराकडून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात एक हजाराहून अधिक बाईक घेऊन त्यांचा भक्त परिवार सहभागी झाला होता. आज अखेर शांतीगिरी महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. 

पत्रक जारी करत शांतीगिरी महाराजांकडून महायुतीला इशारा 

दरम्यान, नुकताच शांतीगिरी महाराजांनी आपली ताकद काय आहे? हे सांगत एकप्रकारे महायुतीच्या नेत्यांनाच इशारा दिला होता. त्यांनी एक पत्रक जारी केले होते. या पत्रात म्हटले होते की, 

  • 1 लाख 80 हजार कुटुंबांच्या भक्तपरिवाराचे सुमारे 4 लाख फिक्स मतदान.
  • जळगाव, धुळे, नंदुरबार, सटाणा, कळवण, मालेगाव, निफाड, चांदवड, नगर, संभाजीनगर यासारख्या अनेक भागातील भक्त परिवाराचे नाशिकमधील नातेवाईकांचे मतदान.
  • जातीय समीकरण मोडून काढण्याची ताकद असलेला 18 पगड जाती आणि बारा बलुतेदारांचा जय बाबाजी भक्तपरिवार.
  • शांतीगिरी महाराज यांची स्वच्छ प्रतिमा.
  • खिसे नसलेलं, निस्वार्थ, निष्काम असं ब्रम्हचारी व्यक्तिमहत्व.
  • 7 लोकसभा मतदारसंघात असेलला मोठा प्रभाव.
  • 16 विधानसभा मतदारसंघात निर्णायक भूमिका.
  • सर्वपक्षीय मोठ्या नेत्यांसोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध.
  • नाशिकसाठी निधी खेचून आणण्याची ताकद.
  • अंतर्गत कलहामुळे अनेक पक्षांचे लोकं आतून शांतीगिरी महाराज यांचे काम करण्याची शक्यता.
  • अंजनेरी, कुंभमेळा व इतर धार्मिक मुद्यांवर असलेला प्रभाव.

इतर महत्वाच्या बातम्या

Shantigiri Maharaj : नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असतानाच शांतीगिरी महाराजांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Dindori Lok Sabha : आता माघार नाहीच! माकपच्या जे पी गावितांनी भरला उमेदवारी अर्ज, दिंडोरीत महाविकास आघाडीत बिघाडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज जम्बोमेगाब्लॉक; कल्याण-डोंबिवलीकरांनी लोकलचा प्रवास टाळला, रेल्वे स्थानकांवर नेहमीपेक्षा कमी गर्दी
आज जम्बोमेगाब्लॉक; कल्याण-डोंबिवलीकरांनी लोकलचा प्रवास टाळला, रेल्वे स्थानकांवर नेहमीपेक्षा कमी गर्दी
Chhatrapati Sambhaji Nagar: रात्रीच्या किर्रर्र अंधारात टोळकं गुप्तधन शोधायला बाहेर पडलं, पिशवीत तंत्रमंत्र विद्येचं साहित्य; शेतकऱ्यांनी पाठलाग करुन पकडलं
रात्रीच्या किर्रर्र अंधारात टोळकं गुप्तधन शोधायला बाहेर पडलं, पिशवीत तंत्रमंत्र विद्येचं साहित्य; शेतकऱ्यांनी पाठलाग करुन पकडलं
सांगलीच्या जतमध्ये चाऱ्याचा तुटवडा; छावण्यांची वाढती मागणी, मात्र, आचारसंहितेमुळे मदत मिळणं कठीण
सांगलीच्या जतमध्ये चाऱ्याचा तुटवडा; छावण्यांची वाढती मागणी, मात्र, आचारसंहितेमुळे मदत मिळणं कठीण
Hush Money Case: हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपांत 34 डोनाल्ड ट्रम्प दोषी; राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार?
हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपांत 34 डोनाल्ड ट्रम्प दोषी; राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 31 May 2024Hush Money Case : हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व  34 आरोपांत डोनाल्ड ट्रम्प दोषी ABP MajhaOnion Export Issue : बंगळूरुच्या कांद्यावरील 40 टक्के  निर्यात शुल्क हटवले, महाराष्ट्राचं काय?TOP 90: सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 31 May 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज जम्बोमेगाब्लॉक; कल्याण-डोंबिवलीकरांनी लोकलचा प्रवास टाळला, रेल्वे स्थानकांवर नेहमीपेक्षा कमी गर्दी
आज जम्बोमेगाब्लॉक; कल्याण-डोंबिवलीकरांनी लोकलचा प्रवास टाळला, रेल्वे स्थानकांवर नेहमीपेक्षा कमी गर्दी
Chhatrapati Sambhaji Nagar: रात्रीच्या किर्रर्र अंधारात टोळकं गुप्तधन शोधायला बाहेर पडलं, पिशवीत तंत्रमंत्र विद्येचं साहित्य; शेतकऱ्यांनी पाठलाग करुन पकडलं
रात्रीच्या किर्रर्र अंधारात टोळकं गुप्तधन शोधायला बाहेर पडलं, पिशवीत तंत्रमंत्र विद्येचं साहित्य; शेतकऱ्यांनी पाठलाग करुन पकडलं
सांगलीच्या जतमध्ये चाऱ्याचा तुटवडा; छावण्यांची वाढती मागणी, मात्र, आचारसंहितेमुळे मदत मिळणं कठीण
सांगलीच्या जतमध्ये चाऱ्याचा तुटवडा; छावण्यांची वाढती मागणी, मात्र, आचारसंहितेमुळे मदत मिळणं कठीण
Hush Money Case: हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपांत 34 डोनाल्ड ट्रम्प दोषी; राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार?
हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपांत 34 डोनाल्ड ट्रम्प दोषी; राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार?
Mumbai Mosoon: केरळमध्ये मान्सून दाखल, मुंबईत कधी कोसळणार पाऊस? काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?
केरळमध्ये मान्सून दाखल, मुंबईत कधी कोसळणार पाऊस? काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?
Maharashtra Drought: पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या सर्जा-राजाचा चारा संपला; गोशाळा मालकाने सुनेचे दागिने गहाण ठेवून बँकेतून कर्ज काढलं
पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या सर्जा-राजाचा चारा संपला; गोशाळा मालकाने सुनेचे दागिने गहाण ठेवून बँकेतून कर्ज काढलं
Mumbai Local Train: मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांची कोंडी, मुंबईतील या मार्गांवर धावणाऱ्या बेस्टच्या अतिरिक्त बसेस, जाणून घ्या तपशील
मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांची कोंडी, मुंबईतील या मार्गांवर धावणाऱ्या बेस्टच्या अतिरिक्त बसेस, जाणून घ्या तपशील
Maharashtra News LIVE Updates :पुणे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलांच्या व्यसनाला आळा बसणार! पब-हुक्कावर धाडसत्र
Maharashtra News LIVE Updates : पुणे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलांच्या व्यसनाला आळा बसणार! पब-हुक्कावर धाडसत्र
Embed widget