एक्स्प्लोर

'मी पद्मसिंह पाटील अन् राणांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है', ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना थेट इशारा

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांना थेट इशारा दिला आहे.

Omraje Nimbalkar on Tanaji Sawant : दोन दिवसांपूर्वी ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात शिवसेनेच्या मेळाव्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांचा जोरदार समाचार घेतलाय. 

तानाजी सावंत यांनी म्हटले होते की, सगळ्या सहकारी संस्थाची याने अन् याच्या बापाने वाट लावली. तेरणा बंद पाडला व अन् भंगार विकलं. खापर राणा दादांच्या वडिलांवर फोडलं , तुला लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जिवाचं राण केलं, या सावंत सरांनी तुझ्यासाठी या शेतकऱ्यांची कष्टाची साखर गोडावूनला होती ती 60 लाख क्विंटल विकली, अशा एकेरी उल्लेख करत तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला होता. 

ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना इशारा

यावरून ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांना इशारा दिलाय. ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे की, मी ४० वर्षे मंत्री राहिलेल्या डॉ.पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है, अशा शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी सावंत यांचे नाव न घेता सावंतांना इशारा दिलाय. आता यावर तानाजी सावंत यांच्याकडून काय प्रत्युत्तर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले 

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. यानिमित्त सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सुरु आहे. या प्रचारात राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Lok Sabha Constituency) राजकीय वातावरण चांगलेच तापले. या मतदारसंघातून महाविका आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूने भाजप (BJP) आमदार राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) या निवडणूक लढवत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar Faction) तिकीट देण्यात आलं आहे. धाराशिव लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा 

ओमराजे बोलबच्चन, त्यांनी पुरावे द्यावेत राजकारण सोडून देतो, राणा जगितसिंह पाटलांची जोरदार टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GDP : पाकिस्तानला विकत घ्यायला आपली 'ही' एकच सरकारी कंपनी पुरेशी, शेजारच्या तीन देशांच्या GDP पेक्षा जास्त मालमत्ता 
पाकिस्तानला विकत घ्यायला आपली 'ही' एकच सरकारी कंपनी पुरेशी, शेजारच्या तीन देशांच्या GDP पेक्षा जास्त मालमत्ता 
भारतासाठी पुन्हा एकदा.... विश्वचषकाआधी  ऋषभ पंतचा एल्गार, BCCI नं पोस्ट केला व्हिडीओ
भारतासाठी पुन्हा एकदा.... विश्वचषकाआधी ऋषभ पंतचा एल्गार, BCCI नं पोस्ट केला व्हिडीओ
''ब्लड सॅम्पल बदलण्यासारखा मोठा गुन्हा नाही''; डॉ. तावरेवर माजी आरोग्यमंत्री संतापले, सरकारकडे ही मागणी
''ब्लड सॅम्पल बदलण्यासारखा मोठा गुन्हा नाही''; डॉ. तावरेवर माजी आरोग्यमंत्री संतापले, सरकारकडे ही मागणी
टी20 विश्वचषकात विराटच किंग, सर्वाधिक धावा कोहलीच्या नावावर, टॉप 5 मध्ये कोण कोण?
टी20 विश्वचषकात विराटच किंग, सर्वाधिक धावा कोहलीच्या नावावर, टॉप 5 मध्ये कोण कोण?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Hasan Mushrif On Dr. Ajay Taware :तावरेंच्या निलंबनाची कारवाई अशा घटना पुढे घडू नये म्हणून : मुश्रीफMaharashtra Superfast : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 May 2024Nana Patole on Pune Accident : अपघातावेळी आमदाराचा मुलगाही उपस्थित, पटोलेंचा मोठा आरोप, रोख कुणावर?Pune Accident : Ajay Taware Shrihari Halnor निलंबित; तर 'ससून'चे डीन Vinayak Kale सक्तीच्या रजेवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GDP : पाकिस्तानला विकत घ्यायला आपली 'ही' एकच सरकारी कंपनी पुरेशी, शेजारच्या तीन देशांच्या GDP पेक्षा जास्त मालमत्ता 
पाकिस्तानला विकत घ्यायला आपली 'ही' एकच सरकारी कंपनी पुरेशी, शेजारच्या तीन देशांच्या GDP पेक्षा जास्त मालमत्ता 
भारतासाठी पुन्हा एकदा.... विश्वचषकाआधी  ऋषभ पंतचा एल्गार, BCCI नं पोस्ट केला व्हिडीओ
भारतासाठी पुन्हा एकदा.... विश्वचषकाआधी ऋषभ पंतचा एल्गार, BCCI नं पोस्ट केला व्हिडीओ
''ब्लड सॅम्पल बदलण्यासारखा मोठा गुन्हा नाही''; डॉ. तावरेवर माजी आरोग्यमंत्री संतापले, सरकारकडे ही मागणी
''ब्लड सॅम्पल बदलण्यासारखा मोठा गुन्हा नाही''; डॉ. तावरेवर माजी आरोग्यमंत्री संतापले, सरकारकडे ही मागणी
टी20 विश्वचषकात विराटच किंग, सर्वाधिक धावा कोहलीच्या नावावर, टॉप 5 मध्ये कोण कोण?
टी20 विश्वचषकात विराटच किंग, सर्वाधिक धावा कोहलीच्या नावावर, टॉप 5 मध्ये कोण कोण?
BMC : मुंबईच्या सुशोभीकरणात मोठा घोटाळा, रिपोर्ट देण्यासाठी VJIT च्या अधिकाऱ्याने 50 लाखांची मागणी केली, कंत्राटदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईच्या सुशोभीकरणात मोठा घोटाळा, रिपोर्ट देण्यासाठी VJIT च्या अधिकाऱ्याने 50 लाखांची मागणी केली, कंत्राटदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Pune Accident : अग्रवाल कुटुंबाचे महाबळेश्वरमध्ये सरकारी जमिनीवर फाईव्ह स्टार हॉटेल? अनधिकृत असेल तर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्र्यांचा आदेश
अग्रवाल कुटुंबाचे महाबळेश्वरमध्ये सरकारी जमिनीवर फाईव्ह स्टार हॉटेल? अनधिकृत असेल तर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्र्यांचा आदेश
पुणे अपघात; लेकासाठी ढसाढसा रडणारी आई बेपत्ता, पोलिस घरी पोहोचल्यावर मिळालं वेगळंच उत्तर
पुणे अपघात; लेकासाठी ढसाढसा रडणारी आई बेपत्ता, पोलिस घरी पोहोचल्यावर मिळालं वेगळंच उत्तर
Arvind Kejriwal : इंडिया आघाडीला किती जागा? लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदानापूर्वीच केजरीवालांनी आकडा सांगितला!
इंडिया आघाडीला किती जागा? लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदानापूर्वीच केजरीवालांनी आकडा सांगितला!
Embed widget