मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

प्राचीन आणि अर्वाचीन अक्षरांमधील भेद

Read in Hindi

मोडी लिपी शिकत असताना लेखनाचा सराव करते वेळेस अक्षरांची वळणं प्रमाणबद्ध असावीत, अक्षर सुंदर नसलं तरी सुवाच्य असावं ह्याकडे आपण लक्ष पुरवतो. बोरू किंवा कट्‌ निबच्या लेखणीने लेखन करतो. पण ऐतिहासिक कागदपत्रांमधील अक्षर नीट न्याहाळलं तर आपला मोडी लेखनाचा सराव आणि त्या कागदपत्रांमधील अक्षरांची वळणं ह्यात अंतर असल्याचं दिसून येतं.

खालच्या चित्रामधील लेखन पहा:

'मौजे' हा पूर्ण शब्द, मजकूर शब्दामधील ’कु’ अक्षर आणि सन शब्दामधील ’न’ अक्षराला जोडून लिहिलेला १ हा अंक.

कागदपत्रात मागे-पुढे गावाचं नाव, हिंदू किंवा इसवी दिनांक असे संदर्भ देखील उपलब्ध असले तर घाईघाईत लिहिलेल्या लेखनाचंही चटकन आकलन होतं. पण केवळ इतकीच ओळ अक्षर-ओळखीसाठी समोर आली तर आपण सराव करत असलेल्या मोडी अक्षरांची वळणांच्या तुलनेत वरच्या ओळीमधील शब्दांची वळणे भिन्न असल्यामुळे अक्षर ओळखण्यात अडचण येऊ शकते. ज्यामुळे वरील शब्दांचे भिन्न लिप्यंतर आणि अनुवाद होऊ शकतो. क्वचित प्रसंगी अंकदेखील अक्षर असल्याचा भास होऊ शकतो. लेखन वाचताना आणखी एक गोष्ट लक्षात येते कि लेखनिकाचं मूळ अक्षर सुंदर आहे. मात्र मोडी लेखन करताना लपेटीयुक्त लेखनपद्धतीमुळे हाताला गती मिळते आणि त्या गतीशी समतोल राखताना अक्षरांच्या वळणांमध्ये परिवर्तन होत गेलं आहे.