एक्स्प्लोर

पु्ण्यातून मविआची रवींद्र धंगेकरांनाच लोकसभेची उमेदवारी , पण वसंत मोरे म्हणतात, खासदार तर मीच होणार!

Vasant More, Pune : पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मैदानात उतरले आहेत.

Vasant More, Pune : पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मैदानात उतरले आहेत. काँग्रेसने दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला होता. तर रवींद्र धंगेकर  (Ravindra Dhangekar) यांच्याविरोधात भाजपने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवले आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, आता वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपला इरादा स्पष्ट केला आहे. 

खासदार तर मीच होणार

वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, "कुठपर्यंत पोहोचला राम राम...गेली 21 वर्ष मी सातत्याने श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जात असतो. नेहमीप्रमाणे आजही सकाळी मी नारायणपूरला गेलो आणि दर्शन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी मंदिरा बाहेर बसणाऱ्या भिक्षुक लोकांना सातत्याने काही दक्षना देत असतो. पैकी एका बाबांनी  मला एक पेपरचे कात्रण दिल आणि मला बोलले मी तुमची आज वाटच बघत होतो.  ही घ्या तुमची बातमी म्हणजे वसंत मोरेचा राम राम कुठपर्यंत पोहोचलाय... याचा थोडा अभ्यास करा खासदार तर मीच होणार..."

वसंत मोरे अपक्ष लढणार का?

मनसेचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनसेचा राजीनामा देण्यापूर्वी वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर वसंत मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. शिवाय वसंत मोरे यांनी पुण्याच्या खासदारकीच्या महत्वकांक्षा कोठेही लपवल्या नव्हत्या. आपण पुण्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहोत, असं त्यांनी अनेकदा स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं. त्यामुळे आता धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nilesh Lanke: नगर दक्षिणच्या पॉलिटिकल गेममध्ये येणार ट्विस्ट, निलेश लंकेंच्या पत्नीचं सूचक वक्तव्य, म्हणाल्या...

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
Jitendra Awhad : महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
Pune Accident Case : कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Special Report Mumbai landslide :मायानगरी धोकादायक, डोंगराळ भागातील रहिवाशांना बीएमसीची नोटीसABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 29 May 2024Cm Eknath Shinde Dare village :  दरे गावात शेतातील पिकांची पाहणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावातEknath Shinde vs Sanjay Raut : 'खोक्यां'वरुन मॅटर नोटीसला उत्तर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
Jitendra Awhad : महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
Pune Accident Case : कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
पावसाळ्यात मुंबईत दरड कोसळल्यास जबाबदार कोण? यंदा धोकादायक इमारती, दरडींचं सर्वेक्षण झालंच नाही
पावसाळ्यात मुंबईत दरड कोसळल्यास जबाबदार कोण? यंदा धोकादायक इमारती, दरडींचं सर्वेक्षण झालंच नाही
मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल
मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल
घरातील कुलदैवतेच्या एकदा पाया पडू द्या, अखेरच्या घटका मोजत असलेल्या पतीसाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव
घरातील कुलदैवतेच्या एकदा पाया पडू द्या, अखेरच्या घटका मोजत असलेल्या पतीसाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव
विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा, 26 जूनला मतदान; आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा, 26 जूनला मतदान; A टू Z माहिती
Embed widget