एक्स्प्लोर

''महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, तुमच्या डोळ्यादेखत पक्षांतर''; प्रियंका गांधींचा मोदींवर घणाघात

मोदी सरकारने 16 लाख कोटी रुपयांची माफी बड्या उद्योगपतींना केली. मात्र, शेतकऱ्यांसाठी काय केलं?, असा सवाल प्रियांका गांधींनी जि.प. शाळेच्या मैदानावरुन विचारला

लातूर : मराठवाड्यात दुसऱ्याटप्प्यातील मतदान शुक्रवारी झाल्यानंतर लातूर (Latur) आणि धाराशिवमध्ये 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात प्रचाराला वेग आला असून, राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. त्याचनिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) कोल्हापुरात सभा घेत आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka gandhi) यांचीही उदगीरमध्ये सभा झाली. रोजगार, महागाई, महिलांसाठी विविध योजनांचा दाखला देत प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, महाराष्ट्रातील सत्तांतरावर, आमदारांच्या खरेदी व पक्षांतरावरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. 

मोदी सरकारने 16 लाख कोटी रुपयांची माफी बड्या उद्योगपतींना केली. मात्र, शेतकऱ्यांसाठी काय केलं?, असा सवाल प्रियांका गांधींनी जि.प. शाळेच्या मैदानावरुन विचारला. प्रियंका यांनी आपल्या सभेची सुरुवात मराठीतून केली. भाषणाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले. रोजगार, शेतकरी, महागाईच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. देशात  70 कोटी युवक बेरोजगार असून 30 लाख जागा गेल्या 10 वर्षांत मोदींनी भरल्याच नाहीत. महागाईने सर्व महिला भगिनी त्रस्त झाल्या आहेत. गॅस सिलेंडर 1100 ते 1200 रुपयांवर पोहोचला होता. मात्र, निवडणुकी जवळ आल्या की सिलेंडरचे भाव कमी केले. महिलांसाठी सरकारकडून काहीही मिळत नाही, देशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, सोयाबीनच्या शेतकऱ्यांचे काय हाल आहेत. शेतीच्या प्रत्येक मालावर जीएसटी लावण्यात येत आहे, असे म्हणत प्रियंका गांधींनी मोदी सरकावर हल्लाबोल केला. 

मोदींनी रोजगार दिला का, महागाई कमी केली का, असा सवाल प्रियंका गांधींनी उपस्थित केला. त्यावर, लोकांनी नाही नाही... म्हणत प्रतिसाद दिला. हाथरस,उन्नाव, मणिपूर आणि महिला कुस्तीपटूंचा दाखला देत महिलांवर होत असलेल्या अन्यायावरुन सवाल उपस्थित केले. देशात महिलांवर अत्याचार होत असून अत्याचार करणाऱ्यांना पाठिशी घालण्यात येत असल्याचं प्रियंका गांधींनी म्हटले. 

महाराष्ट्रात सत्तांतरासाठी आमदारांची खरेदी

महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं, पैशाच्या जोरावर आमदार विकत घेतले, तुमच्या डोळ्यादेखत निवडून आलेलं सरकार पाडलं. ज्या आमदारांना तुम्ही मत दिलं, ते आमदार पक्षांतर करत आहेत. तुमच्या डोळ्यादेखत हा गुन्हा होतोय, लोकशाहीची हत्या केली जातेय. आपल्या पूर्वजांनी स्वतंत्र भारतासाठी, लोकशाहीसाठी लढा दिला. मात्र, आज लोकशाहीच दिसत नाही, संविधान बदलण्याची भाषा केली जातेय. पण, संधी मिळाल्यास हे संविधान बदलून टाकतील, संविधानाची ताकद कमी करतील, असेही प्रियंका गांधींनी म्हटले. इलेक्ट्रोल बाँडचा संदर्भ देत, मोदी सरकारने मोठा घोटाळा केल्याचं म्हटलं.  

दरम्यान, लातूर आणि चाकूर येथे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचाही संवाद मेळावा आणि सभांचं नियोजन आज करण्यात आलं आहे. भाजपा नेतेही लातूरमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
Jitendra Awhad : महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
Pune Accident Case : कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Special Report Mumbai landslide :मायानगरी धोकादायक, डोंगराळ भागातील रहिवाशांना बीएमसीची नोटीसABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 29 May 2024Cm Eknath Shinde Dare village :  दरे गावात शेतातील पिकांची पाहणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावातEknath Shinde vs Sanjay Raut : 'खोक्यां'वरुन मॅटर नोटीसला उत्तर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
Jitendra Awhad : महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
Pune Accident Case : कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
पावसाळ्यात मुंबईत दरड कोसळल्यास जबाबदार कोण? यंदा धोकादायक इमारती, दरडींचं सर्वेक्षण झालंच नाही
पावसाळ्यात मुंबईत दरड कोसळल्यास जबाबदार कोण? यंदा धोकादायक इमारती, दरडींचं सर्वेक्षण झालंच नाही
मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल
मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल
घरातील कुलदैवतेच्या एकदा पाया पडू द्या, अखेरच्या घटका मोजत असलेल्या पतीसाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव
घरातील कुलदैवतेच्या एकदा पाया पडू द्या, अखेरच्या घटका मोजत असलेल्या पतीसाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव
विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा, 26 जूनला मतदान; आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा, 26 जूनला मतदान; A टू Z माहिती
Embed widget