एक्स्प्लोर

Father's Day 2023 : वडिलांप्रती प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजेच 'फादर्स डे', वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व

Father's Day 2023 : फादर्स डे ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता.

Father's Day 2023 : वडील आणि मुलांमधील नातं खूप खास असतं. हे नातं अधिक खास करण्यासाठी आपण दरवर्षी 'फादर्स डे' (Father's Day 2023) साजरा करतो. खरंतर फादर्स डेची तारीख वर्षानुवर्ष बदलत असते. फादर्स डे अनेक देशांमध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या निमित्ताने फादर्स डे चं महत्त्व आणि इतिहास नेमका काय ते जाणून घेऊयात. 

फादर्स डे' चा इतिहास

'फादर्स डे' ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी फादर्स डे 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. खरंतर, वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड या मुलीने आपल्या वडीलांच्या आठवणीत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1909 मध्ये सुरु झालेल्या मदर्स डे पासून मिळाली.

'फादर्स डे' थीम 2023

यंदाच्या फादर्स डेची थीम 'Celebreting the greatest Hero's of our life' (सेलिब्रेटिंग द ग्रेटेस्ट हिरोज ऑफ अवर लाईफ) अशी आहे. 

'अशी' मिळाली या दिवसाला मान्यता

1916 मध्ये अमेरिकेमध्ये राष्ट्रपती वुडरो विल्सन यांनी या दिवसाला जागतिक स्तरावर साजरा करण्याची मान्यता दिली होती. त्यानंतर 1924 मध्ये राष्ट्रपती कॅल्विन कुलिज यांनी या दिवसाला एक राष्ट्रीय आयोजन म्हणून घोषित केलं. त्यानंतर 1966 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिस-या रविवारी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर 1972 मध्ये राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी पहिल्यांदा या दिवसाला अधिकृतरित्या साजरा करण्याची घोषणा केली.

'फादर्स डे' चं महत्त्व?

खरंतर ज्याप्रमाणे आपण आपल्या आईसाठी मदर्स डे साजरा करतो त्याप्रमाणेच आपले वडिलही आपल्यासाठी किती खास आणि महत्त्वाचे आहेत हे दाखवून देण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे. या दिवशी मुलं आपल्या वडिलांसाठी खास सरप्राईज प्लॅन करतात. त्यांना भेटवस्तू देतात. थोडक्यात आपले वडील आपल्यासाठी किती खास आहेत त्याची जाणीव मुलं त्यांना या गोष्टींमधून करुन देतात. ब-याचदा मुलं जितकी आपल्या आईविषयी असणारे प्रेम मोकळेपणाने व्यक्त करतात तेवढे बाबांविषयी असणारे प्रेम व्यक्त करत नाही. मात्र, या दिवशी तुम्ही बाबांविषयी असणा-या तुमच्या भावना अगदी मोकळेपणाने व्यक्त करु शकतात. म्हणूनच या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे.

प्रत्येक देशात एकाच दिवशी फादर्स डे साजरा केला जातो का?

फादर्स डे प्रत्येक देशांत एकाच दिवशी साजरा केला जात नाही. फादर्स डे भारतात जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो, तर अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये, पोर्तुगाल, स्पेन, क्रोएशिया आणि इटलीसह इतर देश 19 मार्च रोजी फादर्स डे साजरा करतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आणि पापुआ न्यू गिनी गिनीमध्ये सप्टेंबर महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो. 

Important Days in June 2023 : 'वटपौर्णिमा', 'आषाढी एकादशी'सह विविध सणांची मांदियाळी, जून महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune  Car Accident: पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला तेव्हा गाडीतून दोघे उतरले होते, दुसरा मुलगा कोणाचा? नाना पटोलेंचा गंभीर सवाल
पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला तेव्हा गाडीतून दोघे उतरले होते, दुसरा मुलगा कोणाचा? नाना पटोलेंचा गंभीर सवाल
June OTT Release : जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेब सीरिजचा वर्षाव; तुम्ही काय पाहणार?
जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेब सीरिजचा वर्षाव; तुम्ही काय पाहणार?
मालेगाव : अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, घटनास्थळी दोन्ही बाजूंनी फायरिंग, आतापर्यंत दोघांना बेड्या
मालेगाव : अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, घटनास्थळी दोन्ही बाजूंनी फायरिंग, आतापर्यंत दोघांना बेड्या
Pune Porsche Accident: विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड; पोर्शेच्या टीमकडून कारची पाहणी पूर्ण, काय लागलं हाती?
विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड, काय लागलं हाती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Supriya Sule on Sassoon hospital : ससूनच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा, सुळेंची मागणीPune Porche Car Accident : पोर्शे गाडीच्या तपासणीतून अपघाताचे धागेदारे हाती लागणार ABP MajhaPM Modi Exclusive Interview : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महामुलाखतNilesh Rane on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना आवरलं पाहिजे, निलेश राणेंनी डिवचलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune  Car Accident: पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला तेव्हा गाडीतून दोघे उतरले होते, दुसरा मुलगा कोणाचा? नाना पटोलेंचा गंभीर सवाल
पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला तेव्हा गाडीतून दोघे उतरले होते, दुसरा मुलगा कोणाचा? नाना पटोलेंचा गंभीर सवाल
June OTT Release : जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेब सीरिजचा वर्षाव; तुम्ही काय पाहणार?
जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेब सीरिजचा वर्षाव; तुम्ही काय पाहणार?
मालेगाव : अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, घटनास्थळी दोन्ही बाजूंनी फायरिंग, आतापर्यंत दोघांना बेड्या
मालेगाव : अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, घटनास्थळी दोन्ही बाजूंनी फायरिंग, आतापर्यंत दोघांना बेड्या
Pune Porsche Accident: विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड; पोर्शेच्या टीमकडून कारची पाहणी पूर्ण, काय लागलं हाती?
विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड, काय लागलं हाती?
गुरमीत राम रहिमला मोठा दिलासा; हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द
गुरमीत राम रहिमला मोठा दिलासा; हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द
Superstar Actor: आजवर एकाही सिनेमानं पार केला नाही 100 कोटींचा टप्पा; पण भाईजान, किंग खानही पडतात फिके, 'हा' सिनेइंडस्ट्रीचा 'सुपरस्टार'
आजवर एकाही सिनेमानं पार केला नाही 100 कोटींचा टप्पा; पण भाईजान, किंग खानही पडतात फिके, 'हा' सिनेइंडस्ट्रीचा 'सुपरस्टार'
दबावाला बळी पडू नका, हा विषय समाजाचा; काँग्रेस आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या डीनच्या भेटीला
दबावाला बळी पडू नका, हा विषय समाजाचा; काँग्रेस आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या डीनच्या भेटीला
मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा
मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा
Embed widget