एक्स्प्लोर

Sharad Pawar VIDEO: भाजप नको, बाकी कुणीही चालतील; अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार का यावर शरद पवार म्हणाले... 

Sharad Pawar Exclusive Interview : जे लोक आता भाजपसोबत गेले आहेत, त्यांना 2014 असेल वा 2017, सत्तेसोबत जायचं होतं असं शरद पवारांनी सांगितलं.

मुंबई: भाजपसोबत जायचं नाही ही आपली भूमिका या आधीही होती, आणि यापुढेही राहिल असं सांगत जर कुणाला परत यायचं असेल तर इंडिया आघाडीत यावं असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. जे सहकारी सोडून गेलेत त्यांना परत यायचं असेल तर यावं, फक्त भाजप नको अशी ठाम भूमिका शरद पवारांनी घेतली. या देशाची सत्ता पुन्हा भाजपकडे गेल्यास ती देशहिताची ठरणार नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो असून यावेळी लोक आम्हाला संधी देतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. शरद पवारांनी 'एबीपी माझा'सोबत संवाद साधताना हे वक्तव्य केलं. 

ठाकरेंसोबत जाण्याचा आमचा प्लॅन

2014 असेल वा 2017 साली असेल, भाजपसोबत जायचा निर्णय हा शरद पवारांनीच घेतला होता, 2019 च्या पहाटेच्या शपथविधीसाठीही त्यांचा पाठिंबा असल्याचं याआधी अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 2014 साली भाजपला पाठिंबा द्यायचं जाहीर केलं, पण तो दिला नाही, तो स्ट्रॅटेजीचा भाग होता. मात्र 2017 साली शिवसेनेला भाजपपासून दूर करून उद्धव ठाकरेंसोबत जायचा आमचा प्लॅन होता, आणि नंतर तो यशस्वी ठरला. जे लोक आता म्हणतात की त्यावेळी भाजपसोबत जायचं ठरलं होतं, त्यांना भाजपसोबत जायचं नव्हतं तर सत्तेसोबत जायचं होतं. 

बारामतीत मी अॅक्शन घेणार

निवडणुकीमध्ये सून आपल्या विरोधात उभी राहिली, त्याचा काही त्रास नाही, लोकशाहीत तो प्रत्येकाचा अधिकार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. बारातमीत कोण निवडून येणार, काय अंदाज असेल असा प्रश्न केल्यावर शरद पवार म्हणाले की, अंदाज बिंदाज मी सांगत नसतो, मी अॅक्शन घेत असतो. 

यावेळी आम्हाला संधी मिळेल

राज्यातील किती जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, आधी 50 टक्के जागा आम्हाला मिळतील असं वाटत होतं. पण सध्या त्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा ट्रेन्ड दिसतोय. शेवटी लोक काय करतील यावर सगळं अवलंबून असेल. 

पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या, काँग्रेसला एक आणि एमआयएमला एक जागा मिळाली होती. आता तशी अवस्था नाही असं शरद पवारानी सांगितलं. यावेळी भाजपविरोधी वातावरण असल्याने लोक आम्हाला संधी देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Porsche Car Accident : दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराची आज चौकशी; कोणती माहिती समोर येणार?
दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराची आज चौकशी; कोणती माहिती समोर येणार?
Pune Car Accident: आमदार सुनील टिंगरेंनी विशाल अग्रवालचा 46 वा कॉल उचलला, पावणे चार वाजता, धावतच पोलीस स्टेशनला पोहोचले!
आमदार सुनील टिंगरेंच्या मोबाईलवर विशाल अग्रवालचे 45 मिस्ड कॉल, अपघाताच्या रात्री काय काय घडलं?
मोठी बातमी : ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट
मोठी बातमी : ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट
Premachi Goshta Serial Update : संकटात सागर उभा राहणार मुक्ताच्या पाठिशी, सावनी-हर्षवर्धनचा कट होणार यशस्वी?
संकटात सागर उभा राहणार मुक्ताच्या पाठिशी, सावनी-हर्षवर्धनचा कट होणार यशस्वी?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Uddhav Thackeray vs EC : उद्धव ठाकरेंची 'ती' पत्रकार परिषद चौकशीच्या फेऱ्यात, वाद पेटणार?Manoj Jarange Pune Court : मनोज जरांगे पुणे सत्र न्यायालयात दाखल, प्रकरण नेमकं काय?Raj Thackeray Abhijit Panse : मनसे वाढवणार भाजपची अडचण? पदवीधरवर लढण्यावर मनसे ठाम!City 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 31 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Porsche Car Accident : दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराची आज चौकशी; कोणती माहिती समोर येणार?
दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराची आज चौकशी; कोणती माहिती समोर येणार?
Pune Car Accident: आमदार सुनील टिंगरेंनी विशाल अग्रवालचा 46 वा कॉल उचलला, पावणे चार वाजता, धावतच पोलीस स्टेशनला पोहोचले!
आमदार सुनील टिंगरेंच्या मोबाईलवर विशाल अग्रवालचे 45 मिस्ड कॉल, अपघाताच्या रात्री काय काय घडलं?
मोठी बातमी : ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट
मोठी बातमी : ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट
Premachi Goshta Serial Update : संकटात सागर उभा राहणार मुक्ताच्या पाठिशी, सावनी-हर्षवर्धनचा कट होणार यशस्वी?
संकटात सागर उभा राहणार मुक्ताच्या पाठिशी, सावनी-हर्षवर्धनचा कट होणार यशस्वी?
Fact Check: भाजपकडून EVM चोरी? 2022 चा व्हिडिओ खोट्या दाव्यांसह पुन्हा होतोय शेयर, जाणून घ्या सत्य
Fact Check: भाजपकडून EVM चोरी? 2022 चा व्हिडिओ खोट्या दाव्यांसह पुन्हा होतोय शेयर
Maharashtra Loksabha Election 2024: महाराष्ट्रात महायुतीच ठरणार वरचढ? निकालापूर्वीच राजकीय विश्लेषकानं वर्तवलं मोठं भाकीत
महाराष्ट्रात महायुतीच वरचढ? लोकसभा निकालापूर्वीच राजकीय विश्लेषकानं वर्तवलं मोठं भाकीत
Hasan Mushrif on Chhagan Bhujbal : जितेंद्र आव्हाडांनी 'मनुस्मृती' जाळली, पण 'ठिणग्या' पडल्या अजित पवार गटात; आता हसन मुश्रीफ छगन भुजबळांवर भडकले!
जितेंद्र आव्हाडांनी 'मनुस्मृती' जाळली, पण 'ठिणग्या' अजित पवार गटात; आता हसन मुश्रीफ छगन भुजबळांवर भडकले!
गुजरात-कर्नाटकला वेगळा न्याय, महाराष्ट्रावर अन्याय, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक,  लासलगावमध्ये लिलाव पाडले बंद
गुजरात-कर्नाटकला वेगळा न्याय, महाराष्ट्रावर अन्याय, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक,  लासलगावमध्ये लिलाव पाडले बंद
Embed widget