एक्स्प्लोर

काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार

आपल्या देशात 2024 पूर्वी नैराश्याचे वातावरण होते. वीज, पाणी, रस्त्यांच्या अनेक गावात समस्या होत्या.

वर्धा - महाराष्ट्र आणि देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली असून विदर्भातील वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मतदान करण्यात आले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्या टप्प्यातील मतदानादिवशी विदर्भात प्रचार सभेसाठी आले आहेत. वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मोदींची वर्ध्यात सभा होत असून नेहमीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील भूमीतून मराठीत भाषणाला सुरुवात केली.भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या आणि विदर्भातील संतांचे गुणगान गायले. चैत्र एकादशीनिमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाला वंदन करतो, असे मोदींनी म्हटे. आपलं प्रेम आणि आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आहेत. या सभेसाठी लोकांचा उत्साह आणि गर्दी पाहून मी भारावल्याचे मोदींनी म्हटले. मोदींनी आपल्या सभेत पुन्हा एकदा मराठी म्हणीचा वापर करुन विरोधकांना टोला लगावला. 

आपल्या देशात 2024 पूर्वी नैराश्याचे वातावरण होते. वीज, पाणी, रस्त्यांच्या अनेक गावात समस्या होत्या. मात्र, गेल्या 10 वर्षात आपल्या सरकारने 25 कोटी भारतीयांना गरिबातून बाहेर काढले. देशात 50 कोटींहून अधिक बँक खाते नव्याने उघडले आहेत. आता, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दूर नाही,असे मोदींनी म्हटले. मोदी जो गॅरंटी देतो, त्यासाठी दिवसरात्र खपायला मी तयार आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे की, पुढील 5 वर्षात ३ कोटी घरं बनवणार. नळाद्वारे प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणार आहे. आपल्या कुटुंबातील वृद्ध, आई-वडिल यांच्यावरील उपचार खर्चासाठी 5 लाख रुपयांपर्यतचा खर्च शासन करणार आहे. तसेच, ज्याप्रमाणे नळातून पाणी येते, तशाच रितीने पाईपमधून गॅस येणार आहे. देशातील प्रत्येक कोपऱ्यात वंदे भारतप्रमाणे रेल्वे धावतील. भारताने चंद्रयान पाहिले, आता गगनयानही पाहणार आहे, असे आश्वासन मोदींनी दिले.

काँग्रेस आघाडीवर मोदींची टीका

काँग्रेस आणि इंडी आघाडी नेहमीच विकासविरोधी आणि शेतकरी विरोधी राहिली आहे. त्यामुळेच, देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. काँग्रेस आघाडीच्या कामकाजासाठी मराठीत एक म्हण आहे, बारशाला गेला आणि बाराव्याला आला... असे म्हणत मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर बोचरा वार केला. यापूर्वी नागपूरच्या पहिल्या सभेतही मोदींनी मराठी म्हणीचा उल्लेख केला होता. त्यावेळी, पाण्यावर काठी मारल्यानंतर पाणी दुभंगत नाही, असे मोदींनी म्हटले होते. आता, पुन्हा एकदा मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाबोल केला.   

दरम्यान, यावेळी, राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विविध योजनांसाठी काम करत आहे. सिंचन योजना, दळणवळण यांसह अनेक क्षेत्रात महाराष्ट्रात मोठं काम होत असल्याचंही मोदींनी म्हटलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
Panchayat 3 : 300 गावं पालथी घातल्यानंतर मिळालंय 'फुलेरा गाव', भर उन्हात कलाकारांना घालावं लागलं स्वेटर; जाणून घ्या 'पंचायत 3'बद्दलचे पाच मजेदार किस्से
300 गावं पालथी घातल्यानंतर मिळालंय 'फुलेरा गाव', भर उन्हात कलाकारांना घालावं लागलं स्वेटर; जाणून घ्या 'पंचायत 3'बद्दलचे पाच मजेदार किस्से
Jitendra Awhad : महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
Pune Accident Case : कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 May 2024 : ABP MajhaMaharashtra Water Crisis : राज्याभरात पाणी टंचाई, आचारसंहिता 48 तासांमध्ये उठवणार?ABP Majha Headlines : 07.00 AM : 30 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Case Blood Sample Update: पुणे अपघात प्रकरणातील मुलाचे बदललेले सँपल त्याच्या आईचे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
Panchayat 3 : 300 गावं पालथी घातल्यानंतर मिळालंय 'फुलेरा गाव', भर उन्हात कलाकारांना घालावं लागलं स्वेटर; जाणून घ्या 'पंचायत 3'बद्दलचे पाच मजेदार किस्से
300 गावं पालथी घातल्यानंतर मिळालंय 'फुलेरा गाव', भर उन्हात कलाकारांना घालावं लागलं स्वेटर; जाणून घ्या 'पंचायत 3'बद्दलचे पाच मजेदार किस्से
Jitendra Awhad : महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
Pune Accident Case : कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
पावसाळ्यात मुंबईत दरड कोसळल्यास जबाबदार कोण? यंदा धोकादायक इमारती, दरडींचं सर्वेक्षण झालंच नाही
पावसाळ्यात मुंबईत दरड कोसळल्यास जबाबदार कोण? यंदा धोकादायक इमारती, दरडींचं सर्वेक्षण झालंच नाही
मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल
मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल
घरातील कुलदैवतेच्या एकदा पाया पडू द्या, अखेरच्या घटका मोजत असलेल्या पतीसाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव
घरातील कुलदैवतेच्या एकदा पाया पडू द्या, अखेरच्या घटका मोजत असलेल्या पतीसाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव
Embed widget