एक्स्प्लोर

मोठी बातमी : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी!

उत्तर मध्य मुंबईमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वर्षा गायकवाड यांच्याविरोधात त्यांची लढत होणार आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकिट कापण्यात आले आहे. 

Lok sabha Election 2024 : मुंबई : मुंबई उत्तर मध्य (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघात भाजपने (BJP Lok Sabha Election) बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम (ujjwal nikam vs varsha gaikwad ) अशी लढत होणार आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपने या जागेवरील उमेदवारी राखून ठेवली होती. विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट दिलं नव्हतं, त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार हे निश्चित होतं. मात्र अनेक दिवसांपासून या जागेवर भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता होती. अखेर भाजपने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे.

उत्तर मध्य मुंबई (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha Election) ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पूनम महाजन यांना मतदार संघात होत असलेला विरोध यामुळे भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.  उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत. अनेक खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. दहशतवादी कसाबविरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. 

उज्ज्वल निकमांचा परिचय 

प्रख्यात वकील आणि अनेक मोठ्या खटल्यांत सरकारचे वकील
तीन दशकांहून अधिक काळ वकिलीमध्ये
बी एससी व एल एल बी फर्स्टक्लासमध्ये पास
2016 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव
2011मध्ये राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाची मानद डॉक्टरेट
2009 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटीलच्या हस्ते साताऱ्यातील स्वातंत्र्यसैनिक उंधाळकर पुरस्कार
महाराष्ट्र टाइम्सकडून 'स्टेट आयडॉल'पुरस्काराने गौरव
स्टार माझा वाहिनीकडून बेस्ट ऍडवोकेट पुरस्काराने गौरव
डीएनए दैनिकाकडून महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव
नागपूरकरांकडून दक्ष नागरिक म्हणून गौरव
महाराष्ट्र टाइम्सकडून टॉप मराठी अचिव्हर पुरस्काराने गौरव
औरंगाबामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीमरत्न पुरस्काराने गौरव

सरकारी वकील म्हणून लढलेले खटले  
1991 कल्याण रेल्वे बाँबस्फोट खटला
1993 मुंबई साखळी बाँबस्फोट खटला
1994 पुण्यातले राठी हत्याकांड
2003 गेट वे ऑफ इंडिया व झवेरी बाजार बाँबस्फोट खटला
2003 गुलशन कुमार खून प्रकरण
2004  नदीमच्या हस्तांतरणाचा लंडनमधला खटला
2006  खैरलांजी दलित हत्याकांडाचा खटला
2006  गँगस्टर अबु सालेम प्रकरण
2006 प्रमोद महाजन हत्या प्रकरण
2008  मुंबईवरचा दहशतवादी हल्ला
2010 कोल्हापुरातले साखळी बाल हत्याकांड
2010 शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण
2016 डेव्हिड हेडली खटला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jombo Megablock : मुंबईकरांनो, येत्या शनिवार, रविवारी मध्य रेल्वेवर 'महा'मेगाब्लॉक; CSMT, ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणासाठी 36 तासांचा ब्लॉक
मुंबईकरांनो, येत्या शनिवार, रविवारी मध्य रेल्वेवर 'महा'मेगाब्लॉक; आजच प्रवासाचं नियोजन करा!
Jalgaon News: भुसावळमध्ये कारवर अज्ञातांकडून अंधाधूंद गोळीबार; माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू
भुसावळमध्ये कारवर अज्ञातांकडून अंधाधूंद गोळीबार; माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू
आला रे आला...! येत्या 24 तासांत मान्सून केरळात, तर 10 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार; मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार
आनंदवार्ता! येत्या 24 तासांत मान्सून केरळात, तर 10 जूनपर्यंत अख्खा महाराष्ट्र व्यापणार
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Leopard Bhandara : संरक्षण भिंतीवरुन उडी, रस्ता केला  क्रॉस; बिबट्याचा थरारक व्हिडीओ ABP MajhaTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30  May 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 30 May 2024ABP Majha Headlines : 08.00 AM : 30 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jombo Megablock : मुंबईकरांनो, येत्या शनिवार, रविवारी मध्य रेल्वेवर 'महा'मेगाब्लॉक; CSMT, ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणासाठी 36 तासांचा ब्लॉक
मुंबईकरांनो, येत्या शनिवार, रविवारी मध्य रेल्वेवर 'महा'मेगाब्लॉक; आजच प्रवासाचं नियोजन करा!
Jalgaon News: भुसावळमध्ये कारवर अज्ञातांकडून अंधाधूंद गोळीबार; माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू
भुसावळमध्ये कारवर अज्ञातांकडून अंधाधूंद गोळीबार; माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू
आला रे आला...! येत्या 24 तासांत मान्सून केरळात, तर 10 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार; मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार
आनंदवार्ता! येत्या 24 तासांत मान्सून केरळात, तर 10 जूनपर्यंत अख्खा महाराष्ट्र व्यापणार
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
Panchayat 3 : 300 गावं पालथी घातल्यानंतर मिळालंय 'फुलेरा गाव', भर उन्हात कलाकारांना घालावं लागलं स्वेटर; जाणून घ्या 'पंचायत 3'बद्दलचे पाच मजेदार किस्से
300 गावं पालथी घातल्यानंतर मिळालंय 'फुलेरा गाव', भर उन्हात कलाकारांना घालावं लागलं स्वेटर; जाणून घ्या 'पंचायत 3'बद्दलचे पाच मजेदार किस्से
Jitendra Awhad : महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट, अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं
Pune Accident Case : कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, पुणे अपघात प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
3 सेकंदात 100 KMPH चा वेग,पोर्शेची नवीकोरी हायब्रिड 911 कार आली,जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
Embed widget