एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

घराणेशाहीवरून राजकारण तापलं! रोहित पवार म्हणाले, देशात 70 टक्के घराणेशाहीवाले भाजपमध्ये, सुजय विखे म्हणतात, त्यांनी हे बोलणं म्हणजे मोठा विनोद

Rohit Pawar vs Sujay Vikhe Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर सडकून टीका केली होती. यावरून रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांच्यात जुंपली.

Ahmednagar News अहमदनगर : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर जोरदार केली जात आहे. या प्रचारात घराणेशाहीचा (Dynasticism) मुद्दादेखील समोर येताना दिसत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देखील प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर सडकून टीका केली होती. या मुद्द्यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहे. यावरून आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यात जुंपल्याचे दिसून आले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. 

70 टक्के घराणेशाहीवाले भाजपमध्ये - रोहित पवार 

घराणेशाहीच्या मुद्द्यावरून रोहित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, सध्या देशभरात जे खासदार आहेत. त्यातील 70 टक्के घराणेशाहीवाले खासदार हे भाजपमध्ये असल्याची टीका, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पंकजा मुंडे (Pankaja Munde), सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) हे घराणेशाहीतील आहेत. अशी 70 ते 80 नाव सांगता येतील, असं रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटले आहे. सोबतच भाजपचे भाषणातील मुद्दे वेगळे असतात त्यातच खोटं बोल पण रेटून बोल, अशी स्थिती असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. 

रोहित पवारांनी या विषयावर बोलणे म्हणजे मोठा विनोद - सुजय विखे पाटील

तर भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. सुजय विखे पाटील म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला एखाद्या कारणाने तिकीट मिळू शकते. पण शेवटी जनतेच्या मतांवरच उमेदवार निवडून येतो. सध्या जी घराणे राजकारणात टिकली आहेत ते केवळ जनतेने दाखवलेल्या विश्वासावर टिकली आहेत. कुणीही ते जनतेवर लादलेली नाहीत. त्यातच रोहित पवारांनी या विषयावर बोलणे म्हणजे मोठा विनोद आहे. कारण त्यांच्या घरातील एका खोलीत सर्व लोक बसवले तर पूर्ण पक्षच एका घरात बसेल, असा खोचक टोला सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांना लगावला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Sujay Vikhe  : अहमदनगरमध्ये यूट्यूब मुलाखतीवरून राडा, सुजय विखेंना थेट जीवे मारण्याची धमकी; झेड सुरक्षा देण्याची कार्यकर्त्यांची मागणी

Sunil Tatkare on Rohit Pawar : रोहित पवार 2019 मध्येच भाजपात प्रवेश करणार होते, हडपसरमधून त्यांना उमेदवारी हवी होती, सुनील तटकरेंच्या दाव्याने खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

IND vs BAN T20 WC 2024 Sunandan Lele : ओपनिंगमध्ये बदल ते पांड्याचे षटकार, विश्वचषकाची सुरुवात दमदारSanjay Shirsat on Sanjay Raut :  राऊतांकडे हेल्मेट घालून जा,  निकालानंतर ते दडगी मारतील...TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 PM : टॉप 50 न्यूज : 02 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 12 PM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Mumbai Crime News : मुंबई एअरपोर्टवरील अधिकारी चक्रावले; प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोंचं सोनं, पाहा फोटो
प्रवाशाने 'अवघड' जागी सोनं लपवलं, पण कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हुडकून काढलंच, मुंबई एअरपोर्टवर गुदद्वारातून सोन्याची तस्करी
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Deepak Kesarkar: उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
Embed widget