एक्स्प्लोर

उत्तम जानकर यांचा उद्याचा पेपर फुटला! शरद पवारांकडून पुन्हा देवेंद्र फडणवीसांना धोबीपछाड, उत्तम जानकर उद्या हाती घेणार तुतारी

उत्तम जानकर यांच्या गरुड बंगल्यावर शेकडो कार्यकर्त्यांसमोर दोन्ही मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या गटातील 30 वर्षाचे वैर संपवून मनोमिलन घडवून आणण्याची किमया शरद पवार हे साधणार आहेत.

  सोलापूर माढा (Madha) लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) ज्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते माळशिरस येथील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar)  हे उद्याच्या  मेळाव्यात  राष्ट्रवादी शरद पवार गटाला साथ देण्याची घोषणा करणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.  जयंत पाटील , जयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार याना साथ देण्याची घोषणा करणार हे निश्चित झाले आहे . 

उत्तम जानकर यांच्या गरुड बंगल्यावर शेकडो कार्यकर्त्यांसमोर दोन्ही मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या गटातील 30 वर्षाचे वैर संपवून मनोमिलन घडवून आणण्याची किमया शरद पवार हे साधणार आहेत. या घटनेमुळे भाजपच्या माढातीस अडचणी वाढणार असून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस याना धोबी पछाड दिल्याचेही दिसणार आहे. याबाबत उत्तम जानकर हे उद्याच्या मेळाव्यात ही भूमिका जाहीर करणार असले तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्र आमचे तुतारी हाती घ्यायचे ठरले आहे असे सांगत लोकसभेला मोहिते पाटील आणि विधानसभेला उत्तम जानकर हे सूत्र या मेळाव्यात समोर येणार असल्याची माहिती ABP माझाला दिली आहे . 

भाजपकडून वारंवार फसवणूक, कार्यकर्त्यांची तीव्र भावना

भाजपकडून वारंवार फसवणूक होत असल्याची कार्यकर्त्यांची तीव्र भावना होती. यानंतर उत्तम जानकर यांच्या फडणवीस यांच्या सोबत तीन बैठक झाल्या. यात जानकर यांचे समाधान झाले असले तरी कार्यकर्ते मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने  जानकर यांनी काल पुणे येथे जाऊन धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला घेतल्याचे त्यांनी सांगितले होते.  आपला निर्णय उद्याच्या मेळाव्यात जाहीर करणार असून कार्यकर्त्यांना फडणवीस आणि शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देऊन कार्यकर्त्यांना निर्णय काय घ्यायचा हे विचारले जाणार असल्याचे जानकर सांगत आहेत . 

माढा लोकसभेच्या निर्णयावर परिणाम दिसू शकतो

दरम्यान, उत्तम जानकर आज शरद पवारांची भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेऊन 19 एप्रिलला आपली राजकीय भूमिका ठरवणार आहेत. जानकर यांच्या निर्णयाचा माढा लोकसभेच्या निर्णयावर परिणाम दिसू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उत्तम जानकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.  

हे ही वाचा :

33 महिने किती सहन केलंं आम्हाला माहिती, फडणवीसांना कधीही अटक झाली असती; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
मोठी बातमी! विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली गुप्त खोली, या खोलीत नेमकं काय? पुरातत्व विभाग करणार पाहणी
मोठी बातमी! विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली गुप्त खोली, या खोलीत नेमकं काय? पुरातत्व विभाग करणार पाहणी
दुधवाल्या चितळेंकडून तुकाराम मुंडेंचा मंत्रालयात सत्कार, 3 महिन्यात वाटले 226 कोटी; मानले आभार
दुधवाल्या चितळेंकडून तुकाराम मुंडेंचा मंत्रालयात सत्कार, 3 महिन्यात वाटले 226 कोटी; मानले आभार
एका बाजुला उष्णतेची लाट, दुसऱ्या बाजूला जलसंकट, दिल्लीतील पाणीटंचाईचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात
एका बाजुला उष्णतेची लाट, दुसऱ्या बाजूला जलसंकट, दिल्लीतील पाणीटंचाईचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM : 31 May 2024 : ABP MajhaManoj Jarange Pune : जुना गुन्हा, कोर्टात हजेरी जरांगे पाटील काय म्हणाले? ABP MajhaABP Majha Headlines : 01 PM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
मोठी बातमी! विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली गुप्त खोली, या खोलीत नेमकं काय? पुरातत्व विभाग करणार पाहणी
मोठी बातमी! विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली गुप्त खोली, या खोलीत नेमकं काय? पुरातत्व विभाग करणार पाहणी
दुधवाल्या चितळेंकडून तुकाराम मुंडेंचा मंत्रालयात सत्कार, 3 महिन्यात वाटले 226 कोटी; मानले आभार
दुधवाल्या चितळेंकडून तुकाराम मुंडेंचा मंत्रालयात सत्कार, 3 महिन्यात वाटले 226 कोटी; मानले आभार
एका बाजुला उष्णतेची लाट, दुसऱ्या बाजूला जलसंकट, दिल्लीतील पाणीटंचाईचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात
एका बाजुला उष्णतेची लाट, दुसऱ्या बाजूला जलसंकट, दिल्लीतील पाणीटंचाईचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात
पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे, रविंद्र धंगेकर कोल्हापुरात कडाडले
पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे, रविंद्र धंगेकर कोल्हापुरात कडाडले
Biopic On Cricketer Balu Panwalkar:  भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने घायाळ करणाऱ्या क्रिकेटपटूची कहाणी रुपेरी पडद्यावर
भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने घायाळ करणाऱ्या क्रिकेटपटूची कहाणी रुपेरी पडद्यावर
Chhagan Bhujbal: काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच, 80-90 जागांवरुन भुजबळांनी भाजपला सुनावलं!
काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच, 80-90 जागांवरुन भुजबळांनी भाजपला सुनावलं!
Pune Car Accident: आमदार सुनील टिंगरेंनी विशाल अग्रवालचा 46 वा कॉल उचलला, पावणे चार वाजता, धावतच पोलीस स्टेशनला पोहोचले!
आमदार सुनील टिंगरेंच्या मोबाईलवर विशाल अग्रवालचे 45 मिस्ड कॉल, अपघाताच्या रात्री काय काय घडलं?
Embed widget