एक्स्प्लोर

''पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी षडयंत्र तर नाही ना?''; धनुभाऊंच्या भूमिकेवर संशय, प्रमाणपत्रावरुन विरेंद्र पवारांचा पलटवार

महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्या, त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना धनंजय मुंडेंनी बजरंग सोनवणेंना लक्ष्य केलं.

बीड : लोकसभा निवडणुकांच्या रणांगणात मराठवाड्यातील (Marathwada) बीड जिल्ह्यात हाय व्होल्टेज लढत होत असून पंकजा मुंडेंना (Pankaja munde) महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांचं तगडं आव्हान आहे. त्यातच, निवडणुकांपूर्वी राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयाचं केंद्रस्थानही बीड जिल्हाच आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी मराठा उमेदवार मैदानात उतरवला असून आता मराठा आरक्षण हा येथील निवडणुकीत राजकीय मुद्दा बनल्याचं पाहायला मिळत आहे. बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर टीका करताना मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. आता, मराठा समन्वयक विरेंद्र पवार यांनीही धनंजय मुंडेंनी केलेल्या विधानावरुन पलटवार केला आहे. 

महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्या, त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना धनंजय मुंडेंनी बजरंग सोनवणेंना लक्ष्य केलं. विरोधी उमेदवार बहुरंगी आहे, बिगरशेतीचा शेतकरीपुत्र आहे. आम्ही कधी जातपात पाहिली नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी सरकार म्हणून ठामपणे उभे राहिलो. समोरचा उमेदवार मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कुठे होता? कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी मात्र ते सर्वात पुढे, हे काय समाजाचे भले करणार? अशा शब्दात धनंजय मुंडेंनी सोनवणेंवर टीका केली होती. मात्र, धनंजय मुंडेंनी मराठा आरक्षणाचा विषय छेडल्याने येथील राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यात, विरेंद्र पवार यांनी धनंजय मुंडेंना थेट प्रत्युत्तर दिलं.धनंजय मुडेंना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, असे विरेंद्र पवार यांनी म्हटले. 

पंकजा मुंडेंना पाडण्यासाठीचा डाव तर नाही ना?

राजकारणासाठी धनंजय मुंडेंसारखे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात, काहीही संबंध नसताना मराठा आरक्षणाचा विषय काढून निवडणुकीमध्ये जातीय रंग देण्याचा काम मुंडेंनी केलं आहे. नाहक वंजारी आणि मराठा असा वाद निर्माण केला जात आहे. तुमचे राजकीय हेवेदावे काहीही असू द्या. पण, या मराठवाड्यात तुम्ही खासगी वैयक्तिक लाभ मिळवण्यासाठी अशी विधानं करत आहात का. पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी तुम्ही हे करत आहात का, येथे मराठा आणि वंजारी समाजात वाद निर्माण होऊन मराठा समाजाने पंकजा मुंडेंना मतं देऊ नये असे षडयंत्र रचलंय का, हा संशय आम्हाला येत असल्याचेही विरेंद्र पवार यांनी म्हटले. तसेच, धनंजय मुंडेंनी मराठा समाजाच्या प्रमाणपत्राचा दाखला देत जे विधान केलं, त्या विधानाचा मी जाहीर निषेध करतो. महाराष्ट्रात आम्ही असा जातीय तेढ निर्माण होऊ देणार नाही, असेही विरेंद्र पवार यांनी म्हटले.   

मराठा समाजाला आरक्षण मिळत असल्याचा त्रागा

बजरंग सोनवणेंनी ओबीसी दाखला काढला ह्याचे दुःख धनंजय मुंडेंना जास्त झालेले दिसत आहे. कारण, इतके वर्षे मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणातून दूर ठेवल्यामुळे ह्यांचं राजकारण फैलावलं होतं. पण, आता मराठा समाजाला आरक्षण मिळत असल्याचं कुठे तरी त्यांना पटत नाही. म्हणूनच, हा त्रागा करीत आहेत, असेही विरेंद्र पवार यांनी म्हटले. 

आणखी वाचा

मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये; बजरंग सोनवणेंकडून खरपूस समाचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणी मला 'मौत का सौदागर' म्हटलं, कुणी 'गंदी नाली का कीडा', पण...; विरोधकांवर कडाडले पंतप्रधान मोदी
कुणी मला 'मौत का सौदागर' म्हटलं, कुणी 'गंदी नाली का कीडा', पण...; विरोधकांवर कडाडले पंतप्रधान मोदी
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Premachi Goshta Serial Update : अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Accident : पुण्यात भरधाव ट्रकने दोन बाईकस्वारांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यूPune Car Accident Case : आरोपीच्या रक्ताचे सँपल्स बदलणाऱ्या ससूनमधील डॉक्टर्स, शिपयाची कसून चौकशीTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 28 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09: 00 AM 28 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणी मला 'मौत का सौदागर' म्हटलं, कुणी 'गंदी नाली का कीडा', पण...; विरोधकांवर कडाडले पंतप्रधान मोदी
कुणी मला 'मौत का सौदागर' म्हटलं, कुणी 'गंदी नाली का कीडा', पण...; विरोधकांवर कडाडले पंतप्रधान मोदी
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Premachi Goshta Serial Update : अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
Gajanan Kirtikar: गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
RBI: आयसीआयसीआय बँकेला 1 कोटींचा तर येस बँकेला 91 लाखांचा दंड, आरबीआयचा दोन्ही बँकांना दणका, कारण... 
आरबीआयचा आयसीआयसीआय बँक अन् येस बँकेला दणका, दोन्ही बँकांना ठोठावला आर्थिक दंड कारण...
धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
Pune Car Accident: धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
Embed widget