एक्स्प्लोर

Weather : पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, मान्सून सक्रिय न झाल्यानं तापमानात वाढ 

Weather : पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Weather : राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. सध्या बहुतांश भागात उन्हाचा चटका जाणवत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील दोन दिवस विदर्भासाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जूनचा दुसरा आठवडा ओलांडला असून मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. त्यामुळं विदर्भात तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी जास्त आहे.

जूनचा दुसरा आठवडा ओलांडला असून अद्यापही राज्यात मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळं विदर्भात तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी वाढलं आहे. विदर्भातील गोंदिया भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्री मान्सुनचा पाऊस होऊन वातावरणात गारवा निर्माण होऊन तापमान कमी होत असते. पण यंदा दमदार पाऊस न झाल्यानं तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवस विदर्भात उष्णता जास्त जाणवणार आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

मात्र यंदा मान्सून पूर्व पाऊस न झाल्याने वातावरण सरासरीपेक्षा अधिक उष्ण आहे. या परिस्थितीमुळे सन्सट्रोक होण्याची अधिक शक्यता आहे. नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं  नागपूर हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. बिपरजॅाय चक्रीवादळामुळे मॅान्सूनवर परिणाम झाला आहे. मॅान्सून लांबल्याने खरीप पेरणीचं नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. 20 जूननंतर विदर्भात मॅान्सून येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

जोपर्यंत 50 ते 60  टक्के पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करु नये

दरवर्षी मृग नक्षत्रामध्ये पेरणीला सुरुवात होत असते, परंतु यावर्षी अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत. राज्यात बऱ्याच ठिकाणी मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली असली तरीही अजून शेतीसाठी पुरक असा पाऊस राज्यात बरसला नाही. हवामान खात्याने देखील जोपर्यंत 50 ते 60  टक्के पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : नांदेडमध्ये हळद लागवडीच्या क्षेत्रात घट, लांबलेल्या मॉन्सूनसह कमी दराचा परिणाम  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बिर्याणी खाणं पडलं महागात! एका महिलेचा मृत्यू, तर 178 जण रुग्णालयात भरती
बिर्याणी खाणं पडलं महागात! एका महिलेचा मृत्यू, तर 178 जण रुग्णालयात भरती
जुळ्या भावांचे यशही जुळे; दहावीत मिळवले 100 टक्के; भविष्यात 'या' क्षेत्रात करायचंय करिअर
जुळ्या भावांचे यशही जुळे; दहावीत मिळवले 100 टक्के; भविष्यात 'या' क्षेत्रात करायचंय करिअर
महायुतीत वादाची ठिणगी?; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषेदचा उमेदवार जाहीर, नलावडेंना संधी
महायुतीत वादाची ठिणगी?; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषेदचा उमेदवार जाहीर, नलावडेंना संधी
PM Modi On ABP : पंतप्रधान नरेंद्र मोदींची Exclusive मुलाखत, पाहा सायं.7.58 वाजता फक्त एबीपी माझावर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची Exclusive मुलाखत, पाहा सायं.7.58 वाजता फक्त एबीपी माझावर
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 28 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Daregaon : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तीन दिवस दरे गावात मुक्काम ABP MajhaPune Car Accident Update : अपघातावेळी बिल्डरपुत्राच्या कारमध्ये असणाऱ्या मित्रांचाही नोंदवणार जबाबNilesh Rane : PM Modi यांच्या घोषणेवर आक्षेप घेणारे Chhagan Bhujbal कोण? निलेश राणेंचा खोचक सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिर्याणी खाणं पडलं महागात! एका महिलेचा मृत्यू, तर 178 जण रुग्णालयात भरती
बिर्याणी खाणं पडलं महागात! एका महिलेचा मृत्यू, तर 178 जण रुग्णालयात भरती
जुळ्या भावांचे यशही जुळे; दहावीत मिळवले 100 टक्के; भविष्यात 'या' क्षेत्रात करायचंय करिअर
जुळ्या भावांचे यशही जुळे; दहावीत मिळवले 100 टक्के; भविष्यात 'या' क्षेत्रात करायचंय करिअर
महायुतीत वादाची ठिणगी?; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषेदचा उमेदवार जाहीर, नलावडेंना संधी
महायुतीत वादाची ठिणगी?; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषेदचा उमेदवार जाहीर, नलावडेंना संधी
PM Modi On ABP : पंतप्रधान नरेंद्र मोदींची Exclusive मुलाखत, पाहा सायं.7.58 वाजता फक्त एबीपी माझावर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची Exclusive मुलाखत, पाहा सायं.7.58 वाजता फक्त एबीपी माझावर
पुण्यानंतर जळगावातही राजकीय दबाव, अपघातातील आरोपी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचा मुलगा; एकनाथ खडसेंचा आरोप
पुण्यानंतर जळगावातही राजकीय दबाव, अपघातातील आरोपी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचा मुलगा; एकनाथ खडसेंचा आरोप
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2024 | मंगळवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2024 | मंगळवार
रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डबे घसरले, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डबे घसरले, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
महायुतीत दोस्तीत-कुस्ती?; भाजप विधानपरिषदेची जागा लढणारच; बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेला शुभेच्छा
महायुतीत दोस्तीत-कुस्ती?; भाजप विधानपरिषदेची जागा लढणारच; बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेला शुभेच्छा
Embed widget