एक्स्प्लोर

Vijay Shivtare: मोठी बातमी : विजय शिवतारेंनी दुसरा पत्ता टाकला, वेळ पडल्यास भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार

Baramati Loksabha: बारामती लोकसभेची लढत यंदा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. याठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. मात्र, विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात भूमिका घेऊन महायुतीची अडचण वाढवली आहे.

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याविरोधात लढण्याची नियतीने दिलेली असाईनमेंट पूर्ण करण्यासाठी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपण वेळ पडल्यास कोणत्याही मार्गाचा अवलंब करायला तयार असल्याचे संकेत दिले आहेत. विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवतारे यांनी आपण वेळ पडल्यास बारामतीमध्ये (Baramati Loksabha) भाजपच्या कमळ चिन्हावरही लढू, असे सांगत आपला दुसरा पत्ता टाकला आहे. विजय शिवतारे यांचे हे वक्तव्य म्हणजे नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित झाली आहे.

विजय शिवतारे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील जनतेचे नुकसान केले आहे. त्यामुळे मला पवार घराण्याविरोधातील मतं मिळतील. माझ्यावर शिवसेना पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई झाली तरी मी बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणारच, असे विजय शिवतारे यांनी ठणकावून सांगितले. मी शंभुराज देसाई यांना माझी भूमिका सांगितली आहे. ते माझं म्हणणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहेत. मी एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट सांगितली होती. पण त्यांनी म्हटले की, महायुतीत बारामतीची जागा अजित पवार गटाला सुटली आहे. पण सुनेत्रा पवार पराभूत होणार आहेत. त्यामुळे महायुतीचे नुकसान करण्याऐवजी ही जागा शिवसेनेला द्यावी. मी धनुष्यबाणाच्या चिन्हावर बारामती लोकसभेची निवडणूक जिंकून दाखवेन, असा दावा विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर केला होता. परंतु, त्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी बारामतीची जागा शिवसेनेसाठी मागून घेण्याविषयी असमर्थता व्यक्त केली होती. आपल्याला युतीधर्माचे पालन करावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांना सांगितले होते. 

विजय शिवतारे यांच्यावर शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजवल्यानंतरही विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात टीका करणे सुरुच ठेवले आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केलं होतं. या बैठकीला विजय शिवतारे यांना हजर राहण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, शिवतारे या बैठकीकडे फिरकले पण नाहीत. विजय शिवतारे यांनी ही भूमिका बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. तसेच त्यामुळे अजितदादा गट आणि शिंदे गटातील तणावही वाढू शकतो. त्यामुळे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांकडून विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा

बारामतीत विजय शिवतारे अडून बसले, अजितदादा गट जशास तसं वागणार, मावळमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विराट कोहली-रोहित शर्माकडे शेवटची संधी! विश्वविजेता होण्यासाठी करावं लागेल हे काम 
T20 World Cup 2024 : विराट कोहली-रोहित शर्माकडे शेवटची संधी! विश्वविजेता होण्यासाठी करावं लागेल हे काम 
Dombivli Blast : आग विझवायला गेले आणि सिलेंडरचा स्फोट झाला, डोंबिवलीतील चायनिजच्या दुकानात भडका, नऊ जखमी
आग विझवायला गेले आणि सिलेंडरचा स्फोट झाला, डोंबिवलीतील चायनिजच्या दुकानात भडका, नऊ जखमी
Sassoon Hospital : लाच खाऊन रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकणाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती होताच 'ससून'चे डीन विनायक काळेंनी पळ काढला
लाच खाऊन रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकणाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती होताच 'ससून'चे डीन विनायक काळेंनी पळ काढला
अखेर 25 तासांनी लोकल सुरू; रेल्वेच्या 250 कर्मचाऱ्यांनी अविरत केलं काम; पण गुजरातच्या विद्यार्थीनीची परीक्षा बुडाली
अखेर 25 तासांनी लोकल सुरू; रेल्वेच्या 250 कर्मचाऱ्यांनी अविरत केलं काम; पण गुजरातच्या विद्यार्थीनीची परीक्षा बुडाली
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर 1 आणि 2 जूनला 36 तासांचा महामेगाब्लॉकSambhajinagar Tourism : मराठवाडा तहानेनं व्याकूळ, पर्यटनस्थळांना बसला दुष्काळाचा फटकाVinayak Kale Sassoon Hospital : ससूनमधले केवळ दोन ते तीन स्टाफ या सगळ्यांध्ये गुंतलेतBhandara Ramabai Chavan SSC Result :  नाथगोजी समाजातली पहिली मॅट्रिक पास मुलगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विराट कोहली-रोहित शर्माकडे शेवटची संधी! विश्वविजेता होण्यासाठी करावं लागेल हे काम 
T20 World Cup 2024 : विराट कोहली-रोहित शर्माकडे शेवटची संधी! विश्वविजेता होण्यासाठी करावं लागेल हे काम 
Dombivli Blast : आग विझवायला गेले आणि सिलेंडरचा स्फोट झाला, डोंबिवलीतील चायनिजच्या दुकानात भडका, नऊ जखमी
आग विझवायला गेले आणि सिलेंडरचा स्फोट झाला, डोंबिवलीतील चायनिजच्या दुकानात भडका, नऊ जखमी
Sassoon Hospital : लाच खाऊन रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकणाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती होताच 'ससून'चे डीन विनायक काळेंनी पळ काढला
लाच खाऊन रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकणाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती होताच 'ससून'चे डीन विनायक काळेंनी पळ काढला
अखेर 25 तासांनी लोकल सुरू; रेल्वेच्या 250 कर्मचाऱ्यांनी अविरत केलं काम; पण गुजरातच्या विद्यार्थीनीची परीक्षा बुडाली
अखेर 25 तासांनी लोकल सुरू; रेल्वेच्या 250 कर्मचाऱ्यांनी अविरत केलं काम; पण गुजरातच्या विद्यार्थीनीची परीक्षा बुडाली
Prajwal Revanna : महिला अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाची विदेशातून येण्यापूर्वीच जामिनासाठी धडपड, आईकडून न्यायालयात याचिका दाखल
महिला अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाची विदेशातून येण्यापूर्वीच जामिनासाठी धडपड, आईकडून न्यायालयात याचिका दाखल
शिंदेंचे श्रीरंग बारणे की ठाकरेंचे संजोग वाघेरे, कोण बाजी मारणार? 113 टेबलवर मतमोजणी होणार!
शिंदेंचे श्रीरंग बारणे की ठाकरेंचे संजोग वाघेरे, कोण बाजी मारणार? 113 टेबलवर मतमोजणी होणार!
Raju Shetti : अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार; राजू शेट्टींचा इशारा
अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार; राजू शेट्टींचा इशारा
Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरण, कंपनीच्या मालकाला आणखी दोन दिवस पोलिस कोठडी
डोंबिवली स्फोट प्रकरण, कंपनीच्या मालकाला आणखी दोन दिवस पोलिस कोठडी
Embed widget