एक्स्प्लोर

टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य

World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 चा महासंग्राम एक जूनपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे.

Yuvraj Singh T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 चा महासंग्राम एक जूनपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. स्पर्धेला काही दिवस शिल्लक असतानाच विश्वविजेत्या युवराजला आयसीसीनं यंदाच्या टी20 वर्ल्डकपचा ब्रँड अँबेसिडर  म्हणून नियुक्त केले आहे. युवराज सिंह यानं आयसीसीसोबत बोलताना भारतीय संघासाठी विश्वचषकात गेमचेंजर ठरणाऱ्या तीन खेळाडूंची नावं सांगितली आहे. युवराज सिंहच्या मते सूर्यकुमार यादव भारतासाठी एक्स फॅक्टर ठरणार आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहलही गेमचेंजर ठरतील. 

सूर्यकुमार यादव सध्या भन्नाट फॉर्मात आहे. टी 20 सामन्यात सूर्यानं अनेकदा आपला करिष्मा दाखवलाय. यंदाही सूर्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला जातोय. आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत युवराज म्हणाला की, "सूर्यकुमार यादव विश्वचषकात टीम इंडियाचा की प्लेअर असेल. कारण सूर्या ज्या पद्धतीनं खेळतोय तो फक्त 15 चेंडूमध्ये सामन्याचं चित्र बदलू शकतो. सूर्यकुमार यादवमुळे टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकतो."

युवराज सिंह यानं जसप्रीत बुमराह याची भूमिकाही टीम इंडियासाठी महत्वाची ठरेल, असं म्हटलेय. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा की प्लेअर असे. तसेच भारताच्या संघात लेग स्पिनर महत्वाची भूमिका बजावू शकतो. त्यासाठी युजवेंद्र चहल याची निवड करण्यात यावी. युजवेंद्र चहल भन्नाट फॉर्मात आहे, असेही युवी म्हणाला.

 कार्तिक नकोच -

टी 20 विश्वचषकासाठी पुन्हा एकदा दिनेश कार्तिकच्या नावाची चर्चा सुरु झाली. पण युवराजच्या मते दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळणार नाही. कारण, त्याला प्लेईंग 11 मध्ये घेणारच नसेल तर निवडण्यात अर्थ नाही. त्याऐवजी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे दोन पर्याय असतील. 2022 वर्ल्डकपमध्ये कार्तिकला स्थान दिले, पण तो प्रभावी कामगिरी करु शकला नाही. त्याशिवाय दिनेश कार्तिकचं वय हा मोठा फॅक्टर आहे, असेही युवराज म्हणाला. 
 
विराट-रोहितनं निवृत्ती घ्यावी - 

विराट कोहली आणि रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषकात शानदार कामगिरी करतील, यात दुमत नाही. पण विश्वचषकानंतर दोघांनीही टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. पुढील विश्वचषकात युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी, असं मला वाटतेय. विराट आणि रोहित यांना कुठं थांबायचं हे माहितेय, असेही युवी म्हणाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi : निकालाआधी साईदरबारी बड्या नेत्यांची भेट, राणेंच्या लेकाला पंकजाताईंनी सांगितला किस्सा
निकालाआधी साईदरबारी बड्या नेत्यांची भेट, राणेंच्या लेकाला पंकजाताईंनी सांगितला किस्सा
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie :  अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला?
अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला? "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटात समोर येणार सत्य?
अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार
अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Vote Counting Process In India: EVM ची मतमोजणी कशी होते? आतापर्यंत कोणीच न सांगितलेली माहितीABP Majha Headlines : 02 PM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM : 31 May 2024 : ABP MajhaManoj Jarange Pune : जुना गुन्हा, कोर्टात हजेरी जरांगे पाटील काय म्हणाले? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi : निकालाआधी साईदरबारी बड्या नेत्यांची भेट, राणेंच्या लेकाला पंकजाताईंनी सांगितला किस्सा
निकालाआधी साईदरबारी बड्या नेत्यांची भेट, राणेंच्या लेकाला पंकजाताईंनी सांगितला किस्सा
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie :  अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला?
अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला? "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटात समोर येणार सत्य?
अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार
अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार
Chhagan Bhujbal: स्पेशल रिपोर्ट : लोकसभा निवडणुकीत पारडं मविआच्या बाजूने फिरल्यास छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?
स्पेशल रिपोर्ट : लोकसभा निवडणुकीत पारडं मविआच्या बाजूने फिरल्यास छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?
Bihar Politics : भाजप आणि जदयूचा स्वतंत्र प्रचार, नितीशकुमारांचा दाखला देत तेजस्वी यादवांचा मोठा दावा, म्हणाले काहीतरी मोठं घडणार...
Bihar Politics : 4 जूननंतर मोठं काही तरी घडणार, तेजस्वी यादव यांचा नितीशकुमारांचा उल्लेख करत पुन्हा दावा
भेगाळल्या भुईगत जीणं... गावची 110 शेततळं आटली, डोळ्यात पाणी; डाळिंबाच्या बागा वाळल्या, बळीराजावर मजुरीची वेळ
भेगाळल्या भुईगत जीणं... गावची 110 शेततळं आटली, डोळ्यात पाणी; डाळिंबाच्या बागा वाळल्या, बळीराजावर मजुरीची वेळ
Jalna News: जागा हडपण्यासाठी दानवेंनी गरीब कुटुंबाचे घर हडपले, वडेट्टीवारांचा आरोप; काय आहे प्रकरण?
जागा हडपण्यासाठी दानवेंनी गरीब कुटुंबाचे घर हडपले, वडेट्टीवारांचा आरोप; काय आहे प्रकरण?
Embed widget