एक्स्प्लोर

Yavatmal News : पोटदुखीमुळे नवजात बाळ रडत असल्याने अघोरी उपाय, आई-वडिलांकडून बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करुन चटके

Yavatmal News : पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत असल्याने त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे.

Yavatmal News : पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धेला (Superstition) बळी पडून अघोरी उपाय करण्याचे प्रकार घडत आहेत. पोटदुखीमुळे (Stomach Ache) नवजात बाळ सतत रडत असल्याने त्याच्या पोटावर बिब्याचे (Marking Nut) चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये (Yavatmal) उघडकीस आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले, ज्यात बाळाची प्रकृती आणखी बिघडल्याचं कळतं.

ज्येष्ठ मंडळींच्या सांगण्यावरुन बाळाला चटके

घाटंजी तालुक्यातील पारा पीएचसीमध्ये 6 जून रोजी या बाळाचा जन्म झाला. प्रसुती झाल्यानंतर आई आणि बाळाला डिस्चार्ज मिळाला. बाळाला घरी आणण्यात आलं. मात्र घरी आल्यानंतर बाळ एकसारखं रडत होतं. त्यातच आई-वडिलांनी बाळाला डॉक्टरांकडे न नेता गावातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितल्यानुसार आई-वडिलांनी अवघ्या पाच दिवसांच्या बाळाच्या (Newborn Baby) पोटावर बिब्बा गरम करुन त्याचे चटके दिले. मात्र या अमानवी आणि अघोरी उपचारामुळे बाळाची प्रकृती सुधारली नाहीच उलट आणखीच चिंताजनक बनली आहे.

बाळाला जगवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न

यानंतर बाळाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इथे बाळावर उपचार केले जात आहे. बाळाला जगवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु मन हेलावणाऱ्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामीण भागात अजूनही असे अघोरी प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. वारंवार आवाहन आणि जनजागृती करुनही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने चिंता अधिक वाढली आहे.

मेळघाटात आई-वडिलांकडूनच बाळाच्या पोटावर गरम विळ्याचे 100 चटके

अमरावतीमध्ये तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकाराची घटना घडली होती. आजारी असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर आई-वडिलांनीच गरम विळ्याचे चटके देण्यात आले होते. अंधश्रद्धेतून मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई-वडिलांना बाळाच्या पोटावर विळ्याने शंभर चटके दिले. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामधल्या बोरदा या अतिदुर्गम आदिवासी गावात धक्कादायक प्रकार समोर आला होता. बाळाला आठ दिवसांपासून ताप, खोकला होता आणि त्याचे पोट फुगत होते. पण या बाळाला दवाखान्यात न नेता आई-वडील त्याला महिला मांत्रिकाकडे घेऊन गेले. आजारावर उपचार म्हणून तांत्रिकाने बाळाच्या पोटावर चटके देण्यास सांगितले. त्यानुसार आई-वडिलांना या तान्हुल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिले होते.

हेही वाचा

Pune Crime News: अंधश्रद्धेच्या नावाखाली छळाचं सत्र सुरुच; काळ्या कपड्यावरुन सासरच्यांनी केला सुनेचा अमानुष छळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणी मला 'मौत का सौदागर' म्हटलं, कुणी 'गंदी नाली का कीडा', पण...; विरोधकांवर कडाडले पंतप्रधान मोदी
कुणी मला 'मौत का सौदागर' म्हटलं, कुणी 'गंदी नाली का कीडा', पण...; विरोधकांवर कडाडले पंतप्रधान मोदी
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Premachi Goshta Serial Update : अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Accident : पुण्यात भरधाव ट्रकने दोन बाईकस्वारांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यूPune Car Accident Case : आरोपीच्या रक्ताचे सँपल्स बदलणाऱ्या ससूनमधील डॉक्टर्स, शिपयाची कसून चौकशीTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 28 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09: 00 AM 28 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणी मला 'मौत का सौदागर' म्हटलं, कुणी 'गंदी नाली का कीडा', पण...; विरोधकांवर कडाडले पंतप्रधान मोदी
कुणी मला 'मौत का सौदागर' म्हटलं, कुणी 'गंदी नाली का कीडा', पण...; विरोधकांवर कडाडले पंतप्रधान मोदी
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Premachi Goshta Serial Update : अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
Gajanan Kirtikar: गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
RBI: आयसीआयसीआय बँकेला 1 कोटींचा तर येस बँकेला 91 लाखांचा दंड, आरबीआयचा दोन्ही बँकांना दणका, कारण... 
आरबीआयचा आयसीआयसीआय बँक अन् येस बँकेला दणका, दोन्ही बँकांना ठोठावला आर्थिक दंड कारण...
धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
Pune Car Accident: धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
Embed widget