एक्स्प्लोर

Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले

Maharashtra Politics: छगन भुजबळांचा गौप्यस्फोट, अमित शाहांनी भुजबळांच्या नावासाठी धरला होता आग्रह. नाशिकच्या रिंगणातून भुजबळांची माघार. आम्ही तुमचं काम करतोय, मग तुम्हीदेखील आमचं काम केलं पाहिजे, भरत गोगावलेंचं वक्तव्य

ठाणे: छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर ही जागा लढवण्याचा शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेवरुन आता शिंदे गटाचे अजर बोरस्ते किंवा हेमंत गोडसे (Hemant Godse) हे उमेदवार असू शकतात. अमित शाह यांनी नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव सुचवले होते. मात्र, शिंदे गटाने कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे अद्यापपर्यंत नाशिक लोकसभेचा (Nashik Loksabha) उमेदवार जाहीर होऊ शकला नव्हता. आता लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीत छगन भुजबळ शिंदे गटाच्या उमेदवाराला कितपत मदत करतील, याबाबत साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही या निवडणुकीत एक पाऊल पुढे टाकत सुनील तटकरेंसाठी काम करत आहोत. मग छगन भुजबळांनीही आमचं काम केलंच पाहिजे, असे गोगावले यांनी म्हटले.
 
आमच्या इथे तटकरे साहेबांची सीट आहे. आम्ही पण एक पाऊल पुढे टाकून करतोय ना काम. ज्या ज्या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे उमेदवार आहेत, आता सुनेत्रा ताई पवार तिथे आम्ही गेलो होतो प्रचाराला , त्यानंतर आढळराव पाटील त्यांच्याही प्रचाराला गेलो होतो. जिथे त्यांना आमची आवश्यकता तिथे आम्ही जातोय जिथे आम्हाला आवश्यकता तिथे त्यांनी यावे याने आपण ४५ चा आकडा पार करू शकतो, असे भरत गोगावले यांनी म्हटले.
 
छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेतल्याबद्दल मला माहिती नाही. पण तुम्ही सांगताय म्हणजे त्यामध्ये तथ्य असेल. आम्ही महायुतीतर्फे भुजबळ साहेबांचे अभिनंदन करतो. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे असेल आणि 45चा आकडा पार करायचा असेल तर एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. भुजबळांनी ही गोष्ट समजून घेतली असेल तर मी त्यांचं अभिनंदन करतो, असे गोगावले यांनी सांगितले.
 
आम्हाला रत्नागिरीची जागा सोडायची नव्हती पण आता सामंत बंधू प्रचाराला लागलेत: भरत गोगावले

आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे असेल, ४०० पार करायचे असेल, इथे ४५ पार करायचे असेल, तर सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेऊन करायला पाहिजे. नाशिकमध्ये अजय बोरस्ते लढणार की हेमंत गोडसे लढणार, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा आम्ही सोडायला तयार नव्हतो. पण आमचे किरण भैय्या असतील  किंवा उदय सामंत असतील ते आता प्रचारालाही लागले आहेत. त्याप्रमाणे उद्या ठाण्यातील सीट जाहीर झाली तर ते लोक पण हातात हात घालून काम करतील. जर त्यांच्या जागेसाठी आम्ही चार पावले मागे सरकत असू तर त्यांनीही आमच्या जागेसाठी जोर लावला पाहिजे, अशी अपेक्षा भरत गोगावले यांनी व्यक्त केली.
 
आणखी वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Embed widget