एक्स्प्लोर

Avadh Ojha : अनेक IAS, IPS घडवणारे ओझा सर पराभूत, राजकारणात स्वत: 'राजा' होऊ शकले नाहीत

Delhi Avadh Ojha Election Result : दिल्लीतील पटपडगंड विधानसभा मतदारसंघातून आपचे उमेदवार अवध ओझा यांचा मोठा पराभव झाला आहे. 

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रेरणा देणारे, अनेकांना IAS, IPS बनवणारे अवध ओझा यांना राजकारणाच्या पटलावर मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. अवध ओझा हे आम आदमी पक्षाच्या तिकिटावर पटपडगंज मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. पण त्यांना भाजपच्या रवींद्र नेगी यांच्याकडून मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 

अवध ओझा हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून नवी दिल्लीमध्ये ते यूपीएससीचा क्लास घेतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. त्यामध्ये 'राजा बनण्यासाठी काय गरजेचं आहे' या संदर्भातील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दुसऱ्यांना राजा बनवणारे अवध ओझा मात्र स्वतः राजकारणात राजा होऊ शकले नाहीत. 

पटपडगंज मतदारसंघातून भाजपचे रवींद्र सिंह नेगी 28072 मतांनी विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या एकूण तेरा फेऱ्यांनंतर रवींद्र सिंह नेगी यांना 74,060 मते मिळाली, तर अवध ओझा यांना 45,998 मते मिळाली. 

राजकारणात यशस्वी नाहीत

अवध ओझा यांनी 2 डिसेंबर 2024 रोजी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. पक्षात प्रवेश केल्यापासून ते दिल्ली विधानसभा निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली जात होती. या निवडणुकीत 'आप'ने त्यांना पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती. या ठिकाणाहून मनिष सिसोदीय निवडणूक लढायचे. ते यावेळी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या दोघांनाही आता पराभवाचा धक्का बसला आहे. 

मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी

अवध ओझा हे मूळचे उत्तरप्रदेशातील गोंडा परिसरातील आहेत. अवध ओझा यांचे पूर्ण नाव अवध प्रताप ओझा आहे, परंतु UPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये त्यांना ओझा सर म्हणून ओळखले जाते. अवझ ओझा हे गेल्या 22 वर्षांपासून यूपीएससी आणि इतर नागरी सेवा परीक्षांसाठी क्लास घेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar PC : जबरदस्त भाषणानंतर अजितदादांची पत्रकार परिषद, पाहा नेमकं काय म्हणाले ?Amit Shah Full Speech : 370 वेळी केलेल्या भाषणाची पुनरावृत्ती! वक्फ प्रकरणावर शाहांचं स्फोटक भाषणAkhilesh Yadav Vs Amit Shah : वक्फ कायद्यावरील चर्चेदरम्यान अखिलेश यादव-अमित शाह जुगलबंदीSanjay Raut Full Speech :  चुटकी वाजत म्हणाले, ए कोण बोललं बाळासाहेब?राऊत राज्यसभेत भडकले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
Embed widget