Designed & developed byDnyandeep Infotech

१७. कर्मयज्ञ -१

Parent Category: मराठी पुस्तके

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१७. कर्मयज्ञ -१

“काँग्रेस साप्ताहिकाचे प्रकाशन मार्च १९४० मध्ये थांबल्यानंतर गुरुजी काही दिवस बडोदा येथे मावशीकडे जाऊन राहिले. प्रकृती बरी नव्हती. मनहो अशांत होते. पण त्या तीन-चार आठवड्याच्या काळातही त्यांनी काही लेखन केले. अर्धवट
राहिलेली पुस्तके पूर्ण केली. नंतर ते अंमळनेरला आले. त्याच वेळी अंमळनेरच्या गिरणीकामगारांच्या महागाईभत्त्याचा प्रश्‍न उद्‌भवलेल होता. युरोपात दुसरे महायुद्ध भडकले होते आणि त्याची झळ सर्व जगाला लागलेली होती. हिंदुस्थानातही
वस्तुंचे, धान्याचे भाव एकसारखे वाढत होते. तुटपुंज्या पगारात गरीब कामगारांना संसाराचा गाडा ओढणे बिकट होऊन बसले होते. त्यामुळे मुंबई प्रांतातल्या कामगार संघटनांनी महागाईभत्त्याची मागणी केली होती. ती न्याय्य होती. पण
गिरणीमालकांनी ताठर भूमिका घेतलेली होती. ते ही मागणी मान्य करायला तयार नव्हते. म्हणून संपाचे हत्यार उपसणे कामगारांना भाग पडले होते. कामगारांवर अन्याय होत असताना, त्यांची उपासमार होत असताना गुरुजी स्वस्थ कसे
बसणार? अंमळनेरचा गिरणीकामगार संघ तर त्यांचाच. 'संयुक्त खानदेश कामगार फेडरेशन'ची स्थापना गुरुजींच्याच प्रेरणेने झालेली होती. गुरुजी पुढे सरसावले.

धुळे-अंमळनेर येथे जाहीर सभा होऊ लागल्या. वातावरण तापू लागले. 'वेळ आलीच तर संपास तयार रहा' गुरुजी कामगारांना सांगू लागले. शेकडोंच्या संख्येने कामगार मंडळी त्यांच्या संभांना येत असत. गुरुजी त्यांनाही सांगत असत, “नुसते ऐकायला रोज येऊन बसू नका, तर ऐकता ऐकता सूत काता. उद्यापासून मला सभेत दोन अडीचशे तरी टकळ्या फिरताना दिसल्या पाहिजेत. आपण आपला लढा अशा विधायक मार्गाने लढला पाहिजे. अशा रीतीने आपण आपला लढा स्वावलंबनानेही चालवू शकू आणि गिरणीमालकांना नमवू शकू, अशी माझी खात्री आहे.”

न्यायासाठी लढा लढवीत असतानादेखील त्यातील विधायक व स्वावलंबी दृष्टी सुटलेली नव्हती, हे गुरुजींचे वैशिष्ट्य होते. इतर कामगार पुढाऱयांप्रमाणे ते कामगारांना केवळ हक्कासाठीच लढायला भडकवीत नव्हते तर आपल्या कर्तव्यांची जाणीवही देत होते. शेवटी तडजोड झाली; संप करण्याची पाळीच आली नाही.

मध्यंतरी काँग्रेसची सभासदनोंदणी सुरू झाली होती. परंतु त्या कामाला यावी तशी गती मिळालेली नव्हती. गुरुजींनी अशी गती देण्यासाठी आपण उपोषण करावे, असे ठरविले. त्या वेळी त्यांनी काढलेल्य पत्रकात म्हटले होते. “काँग्रेस आज राष्ट्रासाठी स्वातंत्र्य मागत आहे. कदाचित पुन्हा लवकरच लढा सुरू होईल. अशा वेळी काँग्रेसला लाखो लोकांचा पाठिंबा आहे, ही गोष्ट पुन्हा एकदा जगजहीर झाली पाहिजे, बहुजन समाजाच्या मनात काँम्रेसावषयी आस्था आहे; आपलेपणा
आहे. आपण, शहरातून व खेड्यांतून जाऊ तर लाखो सभासद होतील. हजारो तरुणांनी, शेतकऱ्यांनी, कामकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी सर्वत्र हिंडून महाराष्ट्रात दोन लाख सभासद या वर्षी करावेत. अशी प्रचंड मोहीम जर महाराष्ट्रात सुरू झाली
तर केवढे चैतन्य निर्माण होईल! लहानशा केंद्रीभूत कर्मातून शक्तीचा सिंधू निर्माण होतो. उद्या लढा असलाच तर हे उत्पन्न होणारे चैतन्य किती कामास येईल बरे!

“माझ्या मनात हे विचार घोळत होते. काय करावे? सुचेना. आपल्या मनातील संकल्प पुर व्हावा तर त्यासाठी देवाला आळवणे हाच एक उपाय मजजवळ आहे. मी माझ्या देवाला म्हटले, देवा! उद्या ११ तारखेपासून ३१ ऑगस्ट १९४० पर्यंत
मी केवळ पाणी घेऊन राहीन. १ सप्टेंबर १९४० रोजी पारणे करीन. महाराष्ट्रात दोन लाख काँग्रेस सभासद करण्याची लहान-थोरांस, गरीब-श्रीमंतांस, किसान-कामगारांना बुद्धी दे!”

११ ऑगस्ट १९४० रोजी गुरुजींनी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.उपोषणाच्या काळातही पहिले सात-आठ दिवस ते गावोगाव फिरून सभासद नोंदणी करीत होते. सोलापूर, येवले, नाशिक येथे जाऊन त्यांनी प्रचार केला. ३१ गस्टला सायंकाळी त्यांनी उपोषण संपविले. गुरुजींचे २२ पौंड वजन घटले

काहो दिवसांनी अशक्तपणा दूर झाल्याबरोबर गुरुजींची प्रमंती पुनश्च सुरू झाली. त्यातूनही वेळ काढून त्यांनी 'गोड गोष्टी'चे पाच भाग लिहून पूर्ण केले. गुरुजींनी या गोड गोष्टोंबद्दल म्हटले आहे, “तुरुंगात मी अनेक गोष्टी, कधी पाश्चात्त्य वाडूमयातील, कधो इतर, अशा सांगत असे. पुष्कळ मित्र मला म्हणत, 'गुरुजी, या गोष्टी लिहून काढा म्हणजे खेड्यापाड्यांत मुलाबाळांना सांगायला उपयोगी पडतील.' मी म्हणत असे, 'वेळ होईल तेव्हा.करीन सारे.' पाच भाग 'गोड गोष्टीचे देऊन त्यांना दिलेले वचन थोडेतरी पूर्ण करीत आहे. मी आता तुरुंगाच्या दारात पुन्हा आहे. तुरुंगात वेळ मिळाला, दौत-लेखणी मिळाली तर आणखी 'गोडगोष्टीचे भाग लिहीन, किंवा इतर काही लिहून आणीन व पुन्हा माझ्या आवडत्या महाराष्ट्रातील मुलाबाळांना देईन.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

X

Right Click

No right click